नाशिक :
शहरातील डोळ्यांची साथ आटोक्यात येत नसल्याने दिवसा गणिक 200 ते 300 रुग्ण महापालिकेच्या दवाखान्यांमध्ये तपासणीसाठी येत आहे त्यात 60 टक्के रुग्ण हे लहान बालके असल्याचे स्पष्ट झाले आहे.
डोळ्यांची साथ आणखी वाढू नये यासाठी नाशिक महानगरपालिकेने शहरातील सर्व उद्याने 15 दिवसांकरिता बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. गुरुवारी 233 नव्या रुग्णांची तपासणी केल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर नितीन रावते यांनी दिली. 31 ऑगस्ट पर्यंत नाशकातील उद्याने बंद ठेवण्यात येणार आहे.
0 टिप्पण्या