Breaking News: कबूतर चोरल्याच्या कारणावरून अनुसूचित मुलांना अमानुष मारहाण

 🔥 *हरेगाव येथे कडकडीत बंद 
🔥 श्रीरामपूर येथे रास्तारोको 
हरेगाव मध्ये चोरीच्या संशयातून तीन मुलांना डांबून मारहाणभारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी श्रीरामपूर तालुक्यातील हरेगाव येथे सामाजिक एकतेचा संदेश दिला होता त्याच गावच्या परिसरात अनुसूचित जाती प्रवर्गातील तीन मुलांना चोरीच्या संशयातून झाडाला डांबून मारहाण करण्यात आली. त्यांनी कबूतर चोरल्याचा संशय आहे. हरेगाव शेजारीच असलेल्या उंदीर गाव परिसरातील नानासाहेब गलांडे यांच्या वस्तीवर हा खळबळ जनक प्रकार घडला. या वस्तीवर हरीण कोंडून ठेवले असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे.

विशेष म्हणजे या मारहाराणी चे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. माहिती मिळताच रिपब्लिकन संघटनांचे कार्यकर्ते हरेगाव परिसरात जमा झाले. घटनेच्या निषेधार्थ गावकऱ्यांनी उत्स्फूर्त बंद पाळला. मारहाण झालेल्या तिघा तरुणांना श्रीरामपूर येथील साखर कामगार रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालय तसेच पोलीस ठाण्याच्या परिसरात कार्यकर्त्यांनी गर्दी केली. यावेळी रिपाईचे सुरेंद्र थोरात, प्रदीप थोरात, दीपक ओहोळ, नाना खरात, अक्षय माघाडे, अमोल शिंदे, मिलिंद सोनवणे, रोहित कोळगे, स्वप्निल पंडित यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. 

पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीरामपूर विभागाच्या अपर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, उपाधीक्षक संदीप मिटके, पोलीस निरीक्षक चौधरी यांच्यासह पोलीस पथकांनी घटनास्थळाचा पंचनामा करत पीडितांचे जबाब नोंदवले. दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल, कुणीही सामाजिक द्वेष पसरवू नये असे आवाहन यावेळी पोलिसांनी केले.


🔥 *हरेगाव बंद, श्रीरामपुरात रस्ता रोको... रिपब्लिकन संघटना आक्रमक..!* 

व्हिडिओ पहा....

https://youtu.be/k9XS_zFhsJg?si=3zhdMft96UfWJ0NY

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या