Crime Breaking News: आश्रम शाळेत गादीखाली आढळला विद्यार्थ्यांचा मृतदेह

 


आश्रम शाळेतील एका बारा वर्षीय विद्यार्थ्याचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. मुलाचा गादीखाली दबलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. वर्धा जिल्ह्यातील कारंजा घाडगे तालुक्यातील नारा इथल्या यादवरावजी केचे आश्रम शाळेतून ही धक्कादायक घटना समोर आली आहे. शिवम सनोज उईके असे या बारा वर्षीय विद्यार्थ्याचं नाव आहे.


घटनेबाबत अधिक माहिती अशी की, वर्ध्याच्या कारंजा तालुक्यातील नारा इथल्या यादवरावजी केचे आश्रम शाळेत शिवम उईके याचा संशायास्पद स्थितीमध्ये मृतदेह आढळून आला आहे. दररोज सकाळी गाद्यांची थप्पी लावली जाते, व रोज रात्री विद्यार्थ्यांना झोपण्यासाठी गाद्याची थप्पी काढली जाते. रात्री गाद्यांची थप्पी काढताना त्याच्या खाली शिवमचा मृतदेह आढळून आला आहे.


या घटनेनं खळबळ उडाली आहे. शिवम उईके हा अमरावती जिल्ह्यातल्या मेळघाट इथल्या चिखलदरा तालुक्यातील डोमा गावचा रहिवासी आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी शिवमचा मृतदेह ताब्यात घेतला असून, शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. शिवम याचा मृत्यू नेमका कशामळे झाला हे आता शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच स्पष्ट होणार आहे. या घटनेनं खळबळ उडाली असून, घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या