नगर : शहरातील शिवसेनेचे युवा नेते विक्रम राठोड यांचे बंधू आदित्य संजय राठोड यांना कायनेटिक चौकात बंदूक दाखवत मारहाण करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आलाय. मंगळवारी सायंकाळी ते आपल्या कुटुंबीयांसमवेत जात असताना त्यांची गाडी अडवून त्यांना मारहाण करण्यात आली. खुद्द विक्रम राठोड यांनी एका व्हिडिओच्या माध्यमातून ही माहिती दिली.
विक्रम राठोड हे काही कामानिमित्त मुंबईला गेलेले होते. मंगळवारी सायंकाळी त्यांना बंधू आदित्य राठोड यांना एका टोळक्याने डोक्याला बंदूक लावून मारहाण केल्याची माहिती मिळाली. त्यांनी तातडीने काही शिवसैनिकांना घटनास्थळी पाठवून आदित्य यांना मदत करण्यास सांगितले. शिवसैनिकांसह आदित्य राठोड हे फिर्याद देण्यासाठी कोतवाली पोलीस ठाण्यात गेले असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
दरम्यान नगर शहरातील वाढलेल्या गुन्हेगारी प्रकरणाबद्दल विक्रम राठोड यांनी चिंता व्यक्त करत त्यासाठी पोलीस प्रशासनाला जबाबदार धरले आहे. सामान्य माणसांवर असेच हल्ले होत राहिले तर लोक नगरसेवक सोडून जातील, अशी भीती व्यक्त करत त्यांनी नगरकरांना काळजी घेण्याचे आवाहन केले.
0 Comments