Flag Hoisting: स्वातंत्र्य दिनानिमित्त ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते होणार मुख्य शासकीय ध्वजारोहण

हर्षल जोशी l राष्ट्र सह्याद्री 



नाशिक : 
भारतीय स्वातंत्र्याच्या 76 व्या वर्धापन दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभ मंगळवार, 15 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी  9 वाजून 5 मिनिटांनी राज्याचे ग्रामविकास आणि पंचायत राज व पर्यटन मंत्री गिरीश महाजन याच्या हस्ते विभागीय आयुक्त कार्यालय, नाशिकरोड येथे संपन्न होणार आहे. असे विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे व जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी कळविले आहे.


स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमास लोकप्रतिनिधी, स्वातंत्र्य सैनिक, शहिद जवानांच्या पत्नी व वीरमाता, विरपिता, शौर्य पुरस्कार विजेते, राजकीय पक्षांचे पदाधिकारी, सर्व शासकीय अधिकारी, कर्मचारी, माध्यम प्रतिनिधी, इतर मान्यवर, विद्यार्थी आणि नागरिकांनी उपस्थित रहावे.


शासकीय अधिकारी व कर्मचारी यांनी राष्ट्रीय पोषाखत कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी 20 मिनिटे आगोदर उपस्थित रहावे, असेही विभागीय आयुक्त श्री. गमे व जिल्हाधिकारी श्री. शर्मा यांनी कळविले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या