MIDC : पांजरापोळ वरून पुन्हा शीतयुद्ध रंगणार का?

 

उद्योग मंत्र्यांच्या दौऱ्यानंतर आमदार देवयानी फरांदे आणि आमदार सीमा हिरे यांच्यात श्रेयवाद भडकण्याची चिन्हे...ब्युरो रिपोर्ट : राष्ट्र सह्याद्री, नाशिक

 दोन दिवसांपूर्वी नाशिक दौऱ्यावर आलेल्या उद्योग मंत्री उदय सामंत यांच्याकडे उद्योजकांनी वाढीव क्षेत्राची मागणी केली. ही मागणी पूर्ण करण्याचा पुनरुच्चार उद्योगमंत्र्यांनी केला. याप्रकरणी आमदार देवयानी फरांदे यांनी पुढाकार घेत अंबड चुंचाळे जवळील पांजरापोळचे 1000 एकर क्षेत्र घेण्याची तयारी दर्शवली आहे. हा भाग तसा पश्चिम मतदार संघाच्या भाजपाच्या आमदार सीमा हिरे यांच्या मतदारसंघातला आहे, असे असताना उद्योजकांनी आमदार हिरे यांना डावलून फरांदे यांना पुढे केल्याने सत्ताधारी पक्षातील दोन्ही महिला आमदारांमध्ये जुगलबंदी रंगण्याची चर्चा आहे. 

हा विषय काहीसा थंड झाला असतानाच पुन्हा एकदा उद्योग मंत्री नामदार सामंत यांनी पांजरापोळ येथील वाढीव जागेबाबत लवकरच निर्णय घेण्याचे जाहीर करून टाकले. साहजिकच आता पुन्हा जुन्या वादाला नवी फोडणी देण्याचे काम शिंदे गटाच्या मंत्र्यांनी केले असून भाजपाच्याच महिला द्वयींमध्ये द्वंद्व रंगण्याचे चित्र निर्माण झाले आहे. टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या