Story by Harshal Joshi
Nashik :
अजित पवार सत्तेत सहभागी झाल्याबद्दल राष्ट्रवादी गटांमध्ये शरद पवार गट वर अजित पवार गट असे समीकरण पाहायला मिळाले नाशिक जिल्ह्यातील स्थानिक आमदार तसेच काही पदाधिकाऱ्यांनी अजित पवार गटाची निवड केल्यानंतर एक फार मोठा वाद कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाला होता दोघाही गटाच्या वादानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाशिकचे कार्यालय पोलिसांनी तात्पुरत्या स्वरूपात सील केले आहे.
त्यातच पवार काका पुतण्यांमध्ये होणाऱ्या गुप्त गुप्त भेटी व सत्तेत सहभागी झाल्यापासून अजित पवार गटाचे सर्व समर्थक आमदार तथा कार्यकर्ते आजही शरद पवार यांच्या फोटोचा वापर करून जनतेमध्ये जात आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये देखील संभ्रम निर्माण होत असून शरद पवारांनी नुकतीच याविषयी त्यांची स्पष्ट भूमिका मांडली आहे. महाराष्ट्रात हा संभ्रम सर्व दूर पसरून आहे. म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाच्या महाराष्ट्रातील पहिल्या कार्यालयाचे उद्घाटन आज नाशिक येथे झाले. पक्षाचे ज्येष्ठ नेते हेमंत टकले, जिल्हाध्यक्ष कोंडाजी मामा आव्हाड, शहराध्यक्ष गजानन शेलार यांनी यावेळी पत्रकारांना माहिती दिली.
0 Comments