तहसीलदार मिलिंद वाघ यांचे आवाहन
श्रीरामपूर :तालुक्यामध्ये खरीप हंगामात मान्सूनचे आगमन उशिरा झाल्यामुळे तसेच ऑगस्ट महिन्यामध्ये पावसामध्ये मोठा खंड पडल्याने तालुक्यातील काही भागांमध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झालेली असून प्रधानमंत्री पिक विमा योजना नैसर्गिक आपत्ती सानुग्रह अनुदान अदा करण्यासाठी ई पिक पाहणीला अनन्य साधारण महत्व प्राप्त झाले आहे ,यासाठी शासनाने महसूल, कृषी व ग्रामविकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने पीक पाहणी काम मोहीम पूर्ण करण्यासाठी 8 सप्टेंबर ते 14 सप्टेंबर दरम्यान पीक पाहणी सप्ताह राबवण्याचे निर्णय घेतला आहे. या सप्ताहामध्ये तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांनी आपल्या शेतातील पिकाची नोंद इ पीक पाहणी मोबाईल ॲप द्वारे करणे आवश्यक आहे जेणेकरून शेतकरी कोणत्याही शासकीय अनुदानापासून वंचित राहणार नाही यासाठी सर्व शेतकऱ्यांनी दि 15 सप्टेंबर पर्यंत ई पी पाहणी करून घ्यावी असे आवाहन तहसीलदार मिलिंद वाघ यांनी केले आहे .
राज्य शासनाने शेतकऱ्यांसाठी एक रुपयात पिक विमा योजना राबवली असून नुकसान भरपाई मिळण्यासाठी पिक पेरा बंधनकारक आहे, मात्र तालुक्यांमध्ये 14 हजार शेतकऱ्यांनी अद्यापही पीक पेऱ्याची नोंद केलेली नाही अशा शेतकऱ्यांना पिक विमा पासून वंचित राहावे लागू शकते यासाठी शेतकऱ्यांनी आपल्या पीक पेऱ्याची नोंद करून घ्यावी पीक शेतात आहे की नाही, याची पडताळणी करण्यासाठी एक पीक पाहणी करणे गरजेचे आहे यावर्षी राज्य शासनाने एक रुपयात पिक विमा उपलब्ध करून दिल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात विमा भरला आहे पीक विम्याचा लाभ मिळण्यासाठी जे - पीक विमा उतरवताना नोंदवले आहे त्याची ईपीक पाहणी मध्ये नोंद होणे गरजेचे आहे .पीक पाहणी नोंदणी पूर्ण करून घ्यावी व शासनाच्या विविध योजना ज्यामध्ये पीक विमा पीक कर्ज शासकीय अनुदान आधी योजनांचा लाभ घेण्यास मदत होणार आहे नोंद न केल्यास ही भरपाई रक्कम मिळणार नाही याची सर्व शेतकऱ्यांनी नोंद घ्यावी.
0 टिप्पण्या