श्रीरामपूर तालुका पोलिसांची कामगिरी
![]() |
अटक केलेल्या आरोग्य सह श्रीरामपूर तालुका पोलीस निरीक्षक व पथक |
श्रीरामपूर : तालुक्यातील भेर्डापूर येथे महसूल पथकावर प्राणघातक हल्ला करणाऱ्या टोळीतील चौघांना श्रीरामपूर तालुका पोलिसांनी मध्य प्रदेशातून अटक केली. बबन जाधव, अतुल तारडे, आनंद पन्हाळे, गणेश सातपुते अशी अटक केलेल्या चौघांची नावे आहेत. आरोपी श्रीरामपूर तालुक्यातील शिरसगाव व हरेगाव परिसरातील रहिवासी आहेत.
श्रीरामपूर तालुक्यातील भेर्डापूर येथे दोन दिवसांपूर्वी जप्त केलेली वाळू रात्री चोरताना महसूल पथकाने काही लोकांना पकडले. डंपरची चावी काढून घेतली. चालक व मजूर पळून गेले. मात्र अंधारातून आलेल्या आठ-दहा जणांच्या टोळक्याने महसूल पथकावर हल्ला केला. त्यात तलाठी शिवाजी दरेकर, बाबासाहेब कदम, मंडलाधिकारी बाळासाहेब वायखिंडे जखमी झाले. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. महसूल विभागाने या प्रकरणी दोन दिवसांपासून काम बंद आंदोलन सुरू केले आहे.
पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, उपाधीक्षक डॉ. बसवराज शिवपुजे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांनी आरोपींचा शोध घेण्यासाठी एक पोलिसांचे पथक मध्यप्रदेशात रवाना केले.
पोलीस उपनिरीक्षक अतुल बोरसे, हवालदार नवनाथ बोर्डे, पोलीस नाईक शेंगाळे, संतोष कराळे, चांद पठाण यांच्या पथकाने मध्यप्रदेशातील अनवली पुरा भागात मुंबई आग्रा हायवे वरील वैष्नोदेवी लॉज येथून आरोपींना अटक केली.
0 Comments