सख्ख्या भावानेच धाकट्या भावाची निर्घृणपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना मालेगावात घडली आहे.सततच्या भांडणामुळे थोरल्या भावाने धाकट्या भावाचा खून केला आहे.
सख्ख्या भावानेच चाकू भोकसून 23 वर्षीय तरुण भावाची हत्या केल्याची धक्कादायक घटना नाशिकच्या मालेगावातील नूरबागमध्ये समोर आली.
जाविद अहमद मोहम्मद जमील असे मृत तरुणाचे नाव आहे. संशयित मोठा भाऊ मुद्दसीर अहमद मोहम्मद जमील व मृत जाविद यांच्यात सतत भांडणे होत होती. या वादातूनच मुद्दसीरने जाविदचा खून केल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी याप्रकरणी संशयित मुद्दसीरला अटक केली आहे. त्याच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करीत आहे.
0 टिप्पण्या