म्हशीचे व्यापारी यादव अपघातात मृत्युमुखी

 

श्रीरामपूर : येथील म्हशीचे व्यापारी कृपाशंकर यादव यांचा कानपूर येथे ट्रक अपघातात जागीच मृत्यू झाला. म्हशी आणण्यासाठी ते कानपूर येथे गेले होते. सकाळी 14 म्हशी घेऊन एका ट्रक मध्ये ते श्रीरामपूरकडे निघाले असता रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकवर त्यांचा ट्रक धडकला. कृपाशंकर यादव हे क्लीनर साईडला बसलेले होते. त्यांच्या बाजूनेच ट्रक धडकल्याने त्यांना जबर मार लागला. त्यात त्यांचा मृत्यू झाला. 


कृपाशंकर यादव हे म्हशीचे प्रसिद्ध व्यापारी आहेत. श्रीरामपूर शहरातील केव्ही रोड लगत ते राहतात. त्यांच्या अपघाती निधनाने श्रीरामपूर शहर व परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या