हलगी वाद्यात बाजीराव गायकवाड तर ढोलकी वाद्यात संदीप पंचरास लोणीकर ठरले प्रथम क्रमांकाचे मानकरी

तळवडे येथील वाजंत्री स्पर्धानारायणगाव प्रतिनिधी:
======.========
  तळवडे येथे  साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त मातंग एकता आंदोलन व क्रांतीवीर लहुजी वस्ताद साळवे तरुण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय पारंपरिक वाजंत्री स्पर्धा  घेण्यात आल्या.


  या स्पर्धेत दहा संघांनी सहभाग नोंदवला होता. स्पर्धेचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे माजी गृहराज्यमंत्री  व मातंग एकता राज्य अध्यक्ष  मा.रमेश बागवे यांच्या हस्ते करण्यात आले.

    या कार्यक्रमाच्या निमित्ताने माजी नगरसेवक शांताराम भालेकर, माजी नगरसेवक प्रवीण भालेकर, पंकज भालेकर, माजी नगरसेविका संगीता ताम्हाने ,सामाजिक कार्यकर्ते शांताराम भालेकर, आशा भालेकर, किरण पाटोळे ,रमेश भालेकर, पांडुरंग भालेकर, किरण नखाते आदी मान्यवर व  मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते.
   या कार्यक्रमाच्या निमित्ताने तळवडे गावातून भव्य प्रमाणात साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे मिरवणूक काढण्यात आली होती.  मिरवणुकीच्या कार्यक्रमात जुन्या जनत्या लोककलावंतांनी सहभाग घेतला होता .

    या पारंपरिक वाद्य स्पर्धेच्या निमित्ताने अवसरी गावचे बाजीराव गायकवाड अवसरीकर हे हलगी वाद्यात  प्रथम तर  संदीप  पंचरास लोणीकर हे ढोलकी  वाद्यात प्रथम क्रमांकचे मानकरी ठरले. 
   कार्यक्रमाचे प्रास्ताविक दत्तू चव्हाण यांनी केले .तर सूत्रसंचालन सचिन चव्हाण  यांनी केले व आभार शंकर चव्हाण यांनी मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या