जीव धोक्यात घालून सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांनी पेटलेला ट्रक विझविला...!

 घोडेगाव जवळील घटना... एपीआय चौधरींच्या सतर्कतेने मोठा अनर्थ टळला




नेवासा :  तालुक्यातील घोडेगाव जवळ पेट्रोल पंपाजवळ उभ्या ट्रकने घेतला पेट घेतला. सोनई पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी तातडीने पोहचले व जीव धोक्यात घालून आग विझविली. त्यामुळे पुढील होणारा मोठा अनर्थ टळला.

   या बाबत घडलेली हकीगत अशी की, बंदोबस्त दरम्यान सोनई पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी हे आपल्या पेट्रोलिंग करत असताना सांयकाळी ५.३० वाजण्याच्या दरम्यान नगर ते संभाजीनगर जाणाऱ्या रोडवर घोडेगाव शिवार पागिरे पेट्रोलपंप जवळ हायवेवर पेटलेल्या अवस्थेत ट्रक उभा होता शेजारीच पेट्रोल पंप होता. पुढील अनर्थ टाळण्यासाठी सहायक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांनी जवळच असलेल्या पेट्रोलपंप मधुन अग्निशमन सिलेंडर पोलीस गाडीत घेऊन आले व आग विझवली.
           सदर चा ट्रक अहमदनगर ते रायपुर ला कांदा घेवुन चालला होता ट्रक पेटत असतांना व व्हिडीओ काढून तो व्हायरल करणाऱ्या शौकीनांची ही येथे उपस्थिती होती. पण मला काय त्याचे असे समजून ते उत्साहाने व्हिडिओ घेतांना दिसत होते. बघ्यांनी गर्दी केली होती. मात्र माणिक चौधरी यांची इन्ट्री होताच त्यांनी पेट्रोलपंपावरून आणलेला आग विजविण्याचा सिलेंडरने जीव धोक्यात घालून आग विजवण्यासाठी प्रयत्न केला.
त्यानंतर त्यांचे सहकारी पोलीस कॉन्स्टेबल पालवे व पोलीस कॉन्स्टेबल ढोले यांनी मदत केली व होणारा अनर्थ टळला.

   सहायक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी व त्यांचे सहकारी पालवे व ढोले यांनी केलेल्या कामगारीचे सर्वत्र कौतुक करत अभिनंदन होत आहे. आपण समाजाचे देणे लागतो हे विचारात घेऊन इतरांनी देखील बघ्यांची भूमिका न घेता अशा कामात सहकार्य करणे गरजेचे आहे अशी सर्वसामान्य नागरिकांची अपेक्षा आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या