सफरचंदा चा राग ; विक्रेत्यांने ग्राहकावर कोयत्याने केला वार


श्रीगोंदा प्रतिनिधी  -


 श्रीगोंदा शहरातील बगाडे कॉर्नर या ठिकाणी सफरचंदाचा भाव कमी करण्याच्या कारणातून विक्रेता व ग्राहक यांच्यात किरकोळ बाचाबाची झाली. त्यात फळे विक्रेत्याने ग्राहका मारहाण सुरू केली यात मध्यस्थी करणाऱ्या एका युवकाच्या डोक्यात कोयता घातल्याची घटना श्रीगोंद्यात घडली आहे.


 या प्रकरणी पोलिसांनी तिघांना जेरबंद केले आहे. 

                                                                                         याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आढळगाव येथील तरुण श्रीगोंद्यात बगाडे कॉर्नर येथील रस्त्यावरील फळांच्या दुकानात फळ खरेदीसाठी गेले असता सफरचंद बारीक आहेत. योग्य भाव लावून द्या! असे म्हणाल्याचा राग आल्याने  प्रेमदास उबाळे (रा. आढळगाव) याच्या डोक्यात कोयत्याने वार करत जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी


 तिघा आरोपीविरोधात श्रीगोंदा पोलीस ठाण्यात  गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


ही घटना श्रीगोंदा शहरात काल(१७) रात्री पावणेनऊ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी किरण गव्हाणे रा. आढळगाव  यांनी फिर्याद दाखल केली आहे. किरण गव्हाणे व प्रेमदास उबाळे हे दोघे श्रीगोंदा येथे कामानिमित्त आले होते. रात्री पावणेनऊच्या सुमारास हे दोघे मांडवगण रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या आरोपींच्या फळविक्री दुकानात गेले. तिथे सफरचंद कसे किलो आहेत असे विचारले असता आरोपी अतिक बागवान याने दोनशे रुपये किलो असे सांगितले. त्यावर फिर्यादी किरण गव्हाणे याने सफरचंद बारीक आहेत, योग्य भाव लावा असे म्हणाल्याचा राग आल्याने आरोपी अतिक बागवान याने अजहर आणि जुबेर बागवान यांना उद्देशून या दोघांना जिवंत सोडू नका रे हे लई शहाणपण करतायेत असे म्हणून त्यांनी किरण गव्हाणे यास मारहाण करण्यास सुरुवात केली. प्रेमदास उबाळे हा वाद सोडविण्यासाठी गेला असता आरोपी जुबेर बागवान  याने त्याचे हातातील नारळ फोडण्याच्या कोयत्याने आणि जीव ठार मारण्याच्या उद्देशाने त्यातील प्रेमदास उबाळे यांचे डोक्यात मारून गंभीर दुखापत केली. आरोपी अजहर बागवान याने हाताने व लाथाबुक्याने मारहाण केली. तसेच अतिक बागवान याने फळे वाहण्याच्या कॅरेटने वरील दोघांना मारहाण केली. या मारहाणीत प्रेमदास उबाळे याच्या डोक्याला गंभीर इजा झाल्याने त्याच्यावर ग्रामीण रुग्णालयात प्रथमोपचार करून त्याला नगर येथे खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी पोलिस उपनिरीक्षक समीर अभंग यांनी फौजफाट्यासह भेट देत पाहणी केली.  वरील तिघा आरोपीविरोधात श्रीगोंदा पोलीस ठाण्यात  भादंवि ३०७,३२३,३२४,५०४,३४ प्रमाणे  गुन्हा दाखल करण्यात आला असून अतिक बागवान, अजहर बागवान, जुबेर बागवान (सर्व रा. श्रीगोंदा)  याना पोलिसांनी तात्काळ जेरबंद केले आहे या घटनेचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक समीर अभंग करत आहेत.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या