भंडारा उधळल्यानंतर विखे पाटलांची प्रतिक्रिया....
धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांनी निवेदन देताना अचानक राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अंगावर भंडारा उधळला आणि घोषणा दिल्या. पोलिसांनी तात्काळ आंदोलकांना पकडले मात्र 'भंडारा पवित्र असतो, माझ्यावर भंडारा उधळला गेला याचा आनंदच आहे. धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांवर कुठलाही गुन्हा दाखल करू नका, अशा स्पष्ट सूचना विखे पाटील यांनी पोलिसांना दिल्या.
धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांनी अचानकपणे विखे पाटलांच्या अंगावर भंडारा उधळल्याने गोंधळ उडाला. या आंदोलनामुळे कार्यकर्त्यांवर कारवाई होणार अशी शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र खुद्द विखे पाटलांनीच कारवाई न करण्याच्या सूचना दिल्या. ते म्हणाले, भंडारा नेहेमी पवित्र मानला जातो .. भंडाऱ्याची उधळण माझ्यावर झाली याचा निश्चित मला आनंद आहे. प्रतिकात्मक भावना व्यक्त करण्याची ती एक भूमिका असते .. त्यामुळे त्यांनी काही वावग केल असं मला वाटत नाही... ज्यांनी भंडारा उधळला त्यांच्यावर कोणतेही गुन्हे दाखल करू नये किवा कोणतीही कारवाई करू नका अशा सूचना मी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
दरम्यान विखे पाटलांच्या कार्यकर्त्यांनी राज्यभरातून त्यांची विचारपूस केली. त्यांच्या समर्थनार्थ आंदोलन करण्याची भूमिका घेतली. मात्र विखे पाटलांनी सर्वांना शांत केले.
याबाबत प्रतिक्रिया देताना भाजपचे प्रदेश पॅनलिस्ट प्रवक्ते नितीन दिनकर म्हणाले, मराठा धनगर आणि ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावर आमचे नेते मा.ना.राधाकृष्ण विखे पाटील नेहमीच आग्रही राहीले आहेत.
महसूल मंत्री विखे पाटील यांच्यासह नितीन दिनकर |
यानिमिताने सर्वच समाज बांधवांना आठवण करून द्यावीशी वाटते ज्यावेळेस संपूर्ण राज्यात मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर मोर्चे निघत होते.आंदोलन सुरू होती.त्यावेळेस मंत्री विखे पाटील शिर्डी विधानसभा मतदार संघातील मराठा आणि ओबीसी समाजातील विद्यार्थ्यांना लोकनेते पद्मभूषण डॉ बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या अंतर्गत येणार्या सर्व व्यावसायिक महाविद्यालयात पन्नास टक्के फी माफ करून प्रवेश दिले.
राज्यातील एकाही मराठा नेत्याला असा दिलासा समाजातील तरूणांना देता आला नाही.तात्पर्य एवढेच आहे की,आज सोलापूर येथे धनगर समाजातील कार्यकर्त्यांनी आरक्षणाच्या मागणीसाठी निवेदन देताना आमचे नेते मा.ना.राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर भंडार्याची उधळण केली.खंडोबाचा पवित्र भंडारा साहेबांच्या अंगावर उधळल्याने साहेब नेतृत्व अधिकच उजळून निघाले आहे.
आरक्षणाची मागणी करण्याचा हक्क निश्चित आहे.पण तो संवैधानिक मार्गाने हवा.उगाच प्रसिध्दीच्या हव्यास्यापोटी स्टंटबाजी करणे संयुक्तिक नाही.धनगर आरक्षणाच्या संदर्भात यापुर्वी विरोधी पक्षनेते असताना ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी सभागृहात आवाज उठवला होता.आता सतेत असतानाही धनगर समाज्याच्या आरक्षणाच्या बाबतीत नामदार साहेबांची भूमिका तितकीच सकारात्मक आणि न्याय देणारी असेल.
ना.राधाकृष्ण विखे पाटील यांचे समाजकारण सर्वाना ज्ञात आहे.सर्व जात धर्म आणि पंथातील लोकांना बरोबर घेवून जाणारी त्यांची वाटचाल उभा महाराष्ट्र जाणून असल्याने आशा आंदोलनाने आमच्या नेतृत्वाचे सामाजिक पाठबळ अधिकच वाढत असल्याचे स्पष्ट होते.
0 टिप्पण्या