पोरी 'जिंकल्‍या'! क्रिकेटमध्‍ये सुवर्णपदक

 टीम इंडियाच्‍या पोरी 'जिंकल्‍या'! क्रिकेटमध्‍ये सुवर्णपदकाला गवसणी


स्मृती मंधाना आणि जेमिमाह रॉड्रिग्ज यांची दमदार फलंदाजी आणि त्‍यानंतर वेगवान गाेलंदाज तीतस साधू केलेल्‍या भेदक मार्‍याच्‍या जाेरावर आशियाई क्रीडा स्‍पर्धेत भारतीय महिला क्रिकेट संघाने आज ( दि.२५) सुवर्णपदावर मोहर उमटवली. श्रीलंकेचा १९ धावांनी पराभव करत आशियामध्‍ये महिला क्रिकेटमध्‍ये आपला दबदबा पुन्‍हा एकदा सिद्ध केला. भारतीय महिला क्रिकेट संघाने प्रथमच आशियाई क्रीडा स्‍पर्धेत सुवर्ण पदक पटकावले आहे. तसेच या

आशियाई क्रीडा स्‍पर्धेत भारताने पहिल्या उपांत्य फेरीत बांगलादेशचा आठ गडी राखून पराभव केला होता, तर दुसऱ्या उपांत्य फेरीत श्रीलंकेने गतविजेत्या पाकिस्तानचा सहा गडी राखून पराभव करून अंतिम फेरीचे तिकीट निश्चित केले होते. ( Asian Games 2023 Cricket)


 भारताने श्रीलंकेला दिले ११७ धावांचे लक्ष्‍य


सुवर्णपदकाच्या लढतीत भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय संघाची सुरुवात खराब झाली. शेफाली वर्मा १५ चेंडूत ९ धावा करून बाद झाली. यानंतर स्मृतीने जेमिमासोबत दुसऱ्या विकेटसाठी ७३ धावांची भागीदारी केली. रणवीराने ही भागीदारी तोडली. तिने मंधानाला बाद केले. मंधानाने ४५ चेंडूंत ४ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने ४६ धावांची खेळी केली. यानंतर ऋचा घोष ९ धावांवर, कर्णधार हरमनप्रीत कौर दोन धावा तर पूजा वस्त्राकर दोन धावांवर बाद झाली. यानंतर जेमिमाह रॉड्रिग्जने 40 चेंडूंत 5 चौकारांच्या मदतीने 42 धावांची खेळी करत धाव फलक हालता ठेवला. दीप्ती आणि अमनजोत प्रत्येकी एक धाव काढत नाबाद राहिले. भारताने 20 षटकांत सात गडी गमावून 116 धावा केल्या. श्रीलंकेकडून उदेशिका प्रबोधनी, सुगंधिका कुमारी आणि इनोका रणवीराने प्रत्येकी दोन गडी बाद केले.

तीतास साधूची कमाल, श्रीलंकेला सलग तीन धक्‍के

११७ धावांच्‍या लक्ष्‍यचा सामना करताना श्रीलंकेच्‍या संघाला भारताची वेगवान गोलंदाज तितास साधूने सलग दोन धक्‍के दिले. तिने तिसर्‍या षटकात दोन बळी घेतले. श्रीलंकेला पहिला धक्का १३ धावांवर बसला. तिसर्‍या षटकाच्या पहिल्या चेंडूवर तीत साधूने अनुष्का संजीवनीला हरमनप्रीत करवी झेलबाद केले तर चौथ्या चेंडूवर विश्मी गुणरत्ने क्लीन बोल्ड झाली.

एका षटकात दोन बळी घेतल्यानंतर त्याने श्रीलंकेचा सर्वात आश्‍वासक फलंदाज आणि कर्णधार चामारी अटापट्टूलाही श्रीलंकेच्या डावातील पाचव्या षटकात बाद केले. ती १२ धावांवर तंबूत परतली.

परेरा आणि निलाक्षी डी सिल्वाची निर्णायक जोडी राजेश्वरीने फोडली

श्रीलंकेला सलग तीन धक्‍के बसल्‍यानंर हसिनी परेरा आणि निलाक्षी डी सिल्वा यांनी डाव सावरण्‍याचा प्रयत्‍न केला. मात्र राजेश्‍वरी गायकडवाडे यांची जोडील फोडली. ५० धावांवर श्रीलंकेच्‍या संघाला चौथा धक्‍का बसला. राजेश्‍वरीने हसिनी परेराला, वस्त्राकारने झेलबाद केले. हसिनी परेराने २२ चेंडूत २५ धावांची खेळी केली.


 वस्त्राकारने श्रीलंकेला दिला पाचवा धक्‍का

हसिनी परेरा बाद झाल्‍यानंतर निलाक्षीने ओशाडी रणसिंगेच्‍या सहायाने धावफलक हालता ठेवण्‍याचा प्रयत्‍न केला. तिने दमदार फटकेबाजी करत श्रीलंकेच्‍या आशा जिवंत ठेवल्‍या. मात्र ७८ धावांवर पूजा वस्त्राकारने श्रीलंकेला पाचवा धक्‍का दिला. २३ धावांवर खेळत असलेल्‍या निलाक्षी डी सिल्वाला तिने क्लीनबोल्ड केले. यानंतर १९ धावांवर खेळणार्‍या रणसिंघेला दीप्‍ती शर्माने तीतस साधू करवी झेलबाद करत श्रीलंकेला ८६ धावांवर सहावा धक्‍का दिला. दीप्‍ती शर्माने ५ धावांवर कविशा दिलहरीला बाद केले. ९२ धावांवर श्रीलंकेने सातवी विकेट गमावली. तर अखेरच्‍या षटकात राजेश्‍वरी गायकवाडच्‍या गोलंदाजीवर ऋचा घोषने सुगंधिका कुमारीला त्रिफळाचीत करत भारताच्‍या सुवर्णपदकावर मोहर उमटवली.

भारतीय संघ : 


स्मृती मानधना, शेफाली वर्मा, जेमिमाह रॉड्रिग्ज, हरमनप्रीत कौर (कर्णधार), ऋचा घोष (यष्टीरक्षक), दीप्ती शर्मा, देविका वैद्य, अमनजोत कौर, पूजा वस्त्राकर, तीतस साधू, राजेश्वरी गायकवाड.

श्रीलंका संघ :


 चमारी अटापट्टू (कर्णधार), अनुष्का संजीवनी (विकेटकीपर), विशामी गुणरत्ने, निलाक्षी डी सिल्वा, हसिनी परेरा, ओशादी रणसिंघे, इनोका रणवीरा, कविशा दिलहारी, उदेशिका प्रबोधिनी, सुगंधिका कुमारी, इनोशी प्रियदर्शिनी.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या