बोठेच्या जामीन अर्जावर 'नॉट टू से' ऑर्डर!


16 सप्टेंबर रोजी होणार जामीन अर्जावर सुनावणी



नगर : येथील यशस्वीनी ब्रिगेडच्या अध्यक्ष तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्या रेखा जरे खून खटल्यातील मुख्य आरोपी बाळ बोठे याच्या जामीन अर्जावर सरकारी पक्षाकडून कुठलेही म्हणणे न आल्याने न्यायालयाने आज 'नॉट टू से' आदेश दिला. याप्रकरणी पुढील सुनावणी 16 सप्टेंबर रोजी होणार असून बोठे यास जामीन मिळतो का? याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

जिल्हा न्यायाधीश सुनील गोसावी यांच्यापुढे या संवेदनशील प्रकरणाची सुनावणी सुरू आहे. आरोपींचे वकील ॲड. महेश तवले, ॲड. निलेश घाणेकर, ॲड. संजय दुशिंग, ॲड. नितीन भवार, ॲड. सुनील मगरे यांनी मागणी केल्यानंतर काही अटी टाकून बोठेसह सर्व आरोपींना नाशिक सेंट्रल जेल येथून जिल्हा दुय्यम कारागृह येथे वर्ग करण्यात आले. त्यानंतर 25 ऑगस्ट रोजी त्यांच्या जामीनासाठी अर्ज करण्यात आला. आज त्या जमीन अर्जावर सुनावणी होणार होती. मात्र सरकारी पक्षाच्यावतीने आज पर्यंत कुठलेही म्हणणे सादर करण्यात आले नाही. आरोपीचे वकील नितीन भवर यांनी याप्रकरणी सरकारी पक्षाचे कुठलेही म्हणणे नाही असे गृहीत धरून जामीन मंजूर करण्याची मागणी केली. त्यानंतर न्यायालयाने नॉट टू से आदेश दिला मात्र जामिनावर निकाल दिला नाही. याप्रकरणी पुढील सुनावणी 16 सप्टेंबर रोजी होणार आहे. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या