पत्नीला कोल्ड्रिंक मधून दारू पाजली, मित्राच्या सहाय्याने सामूहिक अत्याचार... अन् व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी

 पती सासु सासरा आणि पतीचा मित्र असलेल्या वेटरवर गुन्हा दाखल...



श्रीगोंदा :


 हॉटेल मध्ये जेवणाच्या बहाण्याने नेऊन पत्नीला कोल्ड्रिकमधून बळजबरीने दारू पाजून मित्राच्या सहाय्याने दोन वेळा अत्याचार करणाऱ्या पती आणि त्याच्या मित्रासह अत्याचारित महिलेच्या सासु सासऱ्यावर श्रीगोंदा पोलिस ठाण्यात सामूहिक अत्याचार प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक समीर अभंग करत आहेत.

       या बाबत श्रीगोंदा पोलिस ठाण्यात अत्याचारित महिलेनी दिलेल्या फिर्यादी नुसार फिर्यादी महिलेचे २०१४ साली श्रीगोंदा शहराजवळील एका गावातील तरुणाशी विवाह झाला होता. फिर्यादी महिलेला नीट काम येत नाही,  माहेरवरून पैसे आणले नाही म्हणून पती सासु सासरे वेळोवेळी छळ करत असल्याने फिर्यादी महिला आठ महिन्यापूर्वी माहेरी निघून गेली होती. काही दिवसापूर्वी पतीने पीडित महिलेला माघारी पुन्हा नांदण्यास आणले आणि जेवणाच्या बहाण्याने श्रीगोंदा शहरातील एका हॉटेल वरील लॉजवर नेले. कोल्ड्रिंक मध्ये दारू टाकत तिला बळजबरीने दारू पाजून हॉटेल मधील मित्र असलेल्या वेटरच्या सहाय्याने नशेत असलेल्या पत्नीवर बळजबरीने अत्याचार करत त्याचे व्हिडिओ चित्रीकरण केले. 

घडलेली घटना महिलेने तिच्या सासु सासऱ्याना सांगितली असता त्यांनी तिला नवरा जे सांगेल ते गुपचूप कर असे सांगत तिला शांत राहण्यास सांगितले. या घटने नंतर पुन्हा काही दिवसांनी अत्याचारित महिलेला तिच्या पतीने पुन्हा बळजबरीने हॉटेल मध्ये जेवण करण्यासाठी घेऊन जात तिला पुन्हा कोल्ड्रिंक्स मध्ये दारू टाकत बळजबरीने दारू पाजली आणि पुन्हा एकदा हॉटेल मधील मित्र असलेल्या वेटरच्या सहाय्याने नशेत असलेल्या पत्नीवर बळजबरीने अत्याचार करत त्याचे व्हिडिओ चित्रीकरण करत घडलेली घटना कोणाला सांगितली तर व्हिडिओ चित्रीकरण सोशल मीडियावर प्रसिद्ध करण्याची धमकी दिली. अखेर या प्रकरणाने घाबरलेल्या महिलेने घडलेली गोष्ट माहेरी सांगत याबाबत श्रीगोंदा पोलिस ठाण्यात पती, सासु सासरे आणि पतीचा मित्र असलेला हॉटेल मधील वेटर यांचेवर सामूहिक अत्याचार केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या