बीड - परळी राष्ट्रीय महामार्गावर मोठा अपघात : आईसह दोन मुलांचा जागीच मृत्यू



बीड - परळी राष्ट्रीय महामार्गावर मोठा अपघात : आईसह दोन मुलांचा जागीच मृत्यू

बीड जिल्ह्यात भरधाव वेगाने येणाऱ्या कंटेनरने ॲपे रिक्षाला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती, की यामध्ये आईसह दोन मुलांचा जागीच मृत्यू तर एकजण गंभीर जखमी झाला आहे.


बीड -परळी राष्ट्रीय महामार्गावरील बकरवाडी फाट्याजवळ रविवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास हा भयानक अपघात झाला आहे.

नसरीन अजीम शेख (वय 35), नोमान अजीम शेख (वय 13) आणि अदनान अजीम शेख (वय 12) अशी मृत्युमुखी पडलेल्या माय-लेकरांची नावे आहेत. तर रिक्षाचालक अजीम शेख हा गंभीर जखमी झाला असून त्यांच्यावर खासगी हॉस्पिटल मध्ये उपचार सुरु आहे. अपघातग्रस्त बीड शहरातील असल्याची माहिती आहे.

या घटनेनं परिसरातून मोठी हळहळ व्यक्त होत आहे. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, बीड शहरातील (Beed News) अजीम शेख हे आपल्या पत्नी व दोन मुलासह सकाळी थेटे गव्हाण (ता. धारूर) येथे आपल्या सासरवाडीला गेले होते. रात्री परत येत असताना बकरवाडी फाटा येथे समोरून येत असलेल्या कंटेनरवरील आपला ताबा सुटला.

यामुळे समोरून येत असलेल्या रिक्षाला जोरदार धडक (Accident) बसली. अपघात एवढा भीषण होता की ॲपे रिक्षाचा अक्षरशा चुराडा झाला. या घटनेत नसरीन अजीम शेख (वय 35), नोमान अजीम शेख (वय 13 ) आणि अदनान अजीम शेख (वय 12 ) हे तिघे या अपघातामध्ये जागीच ठार झाले.

तर रिक्षा चालक अजीम शेख हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी हॉस्पिटल मध्ये उपचार सुरु आहे. सासुरवाडीवरून येणाऱ्या कुटुंबावर काळाने घाला घातल्याने परिसरातून मोठी हळहळ व्यक्त होत आहे. याप्रकरणी पोलिसांनी कंटेनरचालकाविरोधात गुन्हा दाखल केला असून अधिकचा तपास सुरू आहे.

-


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या