बेलापूरजवळ दरोडा.... बॅटरी व्यवसायिकाचा खून; सात लाख रुपये लुटले...

 


राष्ट्र सह्याद्री प्रतिनिधी l भरत थोरात

श्रीरामपूर : बेलापूर येथील बॅटरी व्यवसायिक नईम रशीद पठाण यांच्या घरावर दरोडा टाकून दरोडेखोरांनी सात लाख रुपये लुटून नेतानाच नईम पठाण यांचा खून केला. नईम यांच्या पत्नीलाही जबर मारहाण करण्यात आली असून त्या गंभीर जखमी आहेत. दरोडेखोरांमध्ये एका महिलेचाही समावेश होता.









श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांनी दिलेल्या माहितीनुसार बेलापूर उक्कलगाव रस्त्यालगत एकलहरे शिवारात समता इंटरनॅशनल स्कूल जवळ नईम पठाण यांचे घर आहे. जागेच्या व्यवहारासाठी त्यांनी सात लाख रुपये घरी आणले होते. कुणीतरी त्यांच्यावर पाळत ठेवली असावी. रात्री दोनच्या सुमारास नईम यांच्या पत्नी बुशरा यांनी घराबाहेरील बाथरूमकडे जाण्यासाठी दरवाजा उघडताच घराच्या बाजूला दबा धरून बसलेले दरोडेखोर घरात घुसले. त्यांनी नईम व त्यांची पत्नी बुशरा यांना त्यांनी जबर मारहाण केली. 

  दरोडेखोरांनी घरातील लहान बाळाच्या झोळीची ओढणी नईमच्या गळ्याला बांधून फास अवळला. त्यात नईमचा मृत्यू झाला व घरातील सात लाख रुपये घेऊन दरोडेखोरांनी पळ काढला. 

 बुशरा हिने एकलहरे गावातील आपल्या वडिलांना ही माहिती देताच गावकरी घटनास्थळी दाखल झाले. सरपंच पती अनिस शेख यांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली. घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांनी घटनास्थळी भेट दिली. जवळच्या व्यक्तीने पाळत ठेवून दरोड्याचा कट असल्याचा संशय ग्रामस्थांमधून व्यक्त होत आहे. 

 

  .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या