पुण्यात गाव गुंडांची दहशत ; मध्यरात्री जाळपोळ
पुणे शहरातील वाढत्या गुन्हेगारीने पोलिसांची डोकेदुखी वाढवली आहे. एकीकडे शहरात गणेशोत्सवाची लगबग सुरू असतानाच शहरातील जनता वसाहत परिसरात अज्ञाताने चार रिक्षा जाळल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, पुणे (Pune) शहरात गाड्यांची तोडफोड, कोयता गॅंगने दहशत माजवल्याचे प्रकार वारंवार समोर येत आहेत. गणपती उत्सवानिमित्त पोलिसांकडून कडक सुरक्षा व्यवस्थेचे नियोजन केले जात असतानाच शहरात चार रिक्षा जाळल्याची घटना घडली आहे.

पुण्यातील जनता वसाहत परिसरात रात्री २.३० वाजता ही घटना घडली. यामध्ये ४ रिक्षा जळून खाक झाल्या असून रिक्षा मालकांचे मोठे नुकसान झाले आहे. या घटनेने परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे. या रिक्षा नेमक्या कोणी आणि कशासाठी पेटवल्या याचा तपास पोलीस करत आहेत.

दरम्यान, पुण्याप्रमाणे कोल्हापूर (Kolhapur) शहरातही मध्यरात्री गावगुंडाची दहशत पाहायला मिळाली. ओव्हरटेक केल्याच्या कारणावरून ट्रकचालकाला मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार कोल्हापूर शहरात घडला. हातात तलवारी घेत मद्यधुंद अवस्थेत ट्रकची तोडफोड करणाऱ्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या