रामपूरवाडी रस्त्याच्या कामाचे परस्पर उद्घाटन : सत्ताधारी गटाची नाराजी

रामपूरवाडी रस्त्याच्या कामाचे परस्पर उद्घाटन 

सत्ताधारी गटाची नाराजीचितळी 


 राहता तालुक्यातील रामपूरवाडी येथील अपूर्ण काम असलेल्या एका रस्त्याचे उद्घाटन विरोधी गटाच्या कार्यकर्त्यांनी केल्याने येथील सत्ताधारी गटाने तीव्र प्रकारची नाराजी व्यक्त केली आहे.


 रामपूरवाडी येथे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे व आमदार आशुतोष काळे व माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या गटाचे कार्यकर्ते असून ग्रामपंचायत विखे व कोल्हे गट वर्चस्वात आहे. 


 सरपंच व उपसरपंच कोल्हे गटाचे आहेत, विखे व कोल्हे गटात सध्या अंतर्गत हेवेदावे व वाद चालु असून आता काही दिवसापूर्वी नुकतेच विखे गटाच्या कार्यकर्त्यांनी एका रस्त्याचे खडीकरणाचे उद्घाटन केले.


 परंतु प्रत्यक्षात ह्या रस्त्याचे काम झालेच नसल्याचे कोल्हे गटाच्या कार्यकर्त्यांनी सांगितले आहे. आम्ही सत्ताधारी असून हे काम करण्याविषय आमच्या सोबत कुठलीही चर्चा केली नाही. आम्हाला विश्वासात घेतले नाही सदर रस्त्याच्या उद्घाटनाला बोलवले गेले नाही.

 यामुळे सरपंच संदीप सुरडकर तसेच कोल्हे गटाच्या कार्यकर्त्यांनी संताप व नाराजी व्यक्त केली असून या कामाचे उद्घाटन सर्वांना विश्वासात घेऊन केले पाहिजे होते असे सरपंच संदीप सुरडकर यांनी मत मांडले.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या