काय होतीस तू ,काय झालीस तू ? पावसा अभावी सिंदफणाचा झाला उकिरडा

 

सिंदफना नदीचे पावित्र्य ,सौंदर्य आणि वैभव लोप पावले हो !


पावसाअभावी आली अवकळा ,झाला सार्जनीक उकिरडा !




आठ दिवसांवर पोळा आता बैलाला कुठे आंघोळ घालायची आणि त्यांचा आढा कसा काढायचा ?


शिरूर कासार :  प्रशांत बाफना

सर्वात मोठी नदी आणि चैतन्य गहिनीनाथांच्या समाधीस्थळ उगम स्थळ असलेल्या सिंदफना नदिला काय होतीस तू काय झालीस तू ? अशी अवस्था पावसाअभावी झाली आहे ,सिंदफना नदीचे पावित्र्य ,सौंदर्य आणि वैभव देखील लोप पावले असून सध्या सिंदफनेला पाण्याअभावी सार्वजनीक उकिरड्याने अवकळा आणली असुन साचलेल्या डबक्याची दुर्गंधी आरोग्याच्या प्रश्नाला पोषक ठरत आहे .



शहराजवळून सिध्देश्वराच्या पायरीचे दर्शन घेऊन वाहत जाणा-या सिंदफनेला पवित्र मानले जात होते ,तीचे  पाण्यामुळे सौंदर्य शहराच्या वैभवात भर टाकत होते ,गतवर्षी हे विलोभनीय चित्र पाहण्यासाठी तास तास डोळे भरून न्याहळत बसण्याची मजा नागरीक घेत होते मात्र यावर्षी पावसाने ते पावित्र्य ,सौंदर्य आणि वैभव सारेच लोप पावले असल्याने यावर्षी सिंदफना नदीला अवकळा आल्याचे विदारक चित्र पहायला मिळते तर पाण्याअभावी कोरडेठाक पडलेले नदीचे पात्र एक सार्वजनीक उकिरडाच बनला असुन साचलेल्या पाण्याची  डबकी दुर्गंधी मुळे डासाला पोषक ठरत असुन आरोग्याला घातक ठरत आहे .


सिध्देश्वराचे दर्शन घेऊन पुढे खडकेश्र्वर आणि कालिका डोह पार करत प्रवाहीत होणारी नदी सर्वांचेच लक्ष वेधत होती ,गत वर्षी तर कित्येकदा आलेला पूर आणि महाविरात्र होईपर्यंत खळखळून वाहणा-या  सिंदफना नदीला मात्र यावर्षी अजुनही पावसाळ्यात अवकळा आल्याचे चित्र पहावत धसल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होत असुन ते वैभव सिंदफनाला पुर्ववत मिळावे अशीच प्रार्थना केली जात आहे .


आठ दिवसांवर पोळा ,बैलांना कुठे आंघोळ घालायची आणि आढा कसा काढायचा ?
बैलपैळ्याला मनसोक्त पोहून त्याची आढा काढला जायचा सिंदफनेत ,स्वच्छ धुवून बैलांचा वर्षभराचा शिन हलका केला जायचा मात्र तीच सिंदफना कोरडी असल्याने बैलाने कुठे पोहायचे आणि त्याला कुठे आंघोळ घालायची ,आढा कसा काढायचा असा प्रश्र्न शेतकऱ्यांना पडला आहे . 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या