पायावर पाय का दिला..? जबर मारहाणीत दोघे अत्यवस्थ!

एसटी स्टँड समोर पान टपरी वरील प्रकार; पोलिसांनी दोघा गुन्हेगारांना घेतले ताब्यातश्रीरामपूर : पान टपरी समोर उभा असताना पायावर पाय दिल्याच्या कारणावरून श्रीरामपूर एसटी स्टँड समोर दोन तरुणांना दांडक्याने जबर मारहाण करण्यात आली. त्यात एकाची प्रकृती गंभीर असल्याने त्याला लोणी येथील प्रवरा मेडिकल ट्रस्ट येथे हलविण्यात आले. तर दुसऱ्यावर श्रीरामपूर येथील साखर कामगार रुग्णालयात उपचार सुरू आहेत. श्रीरामपूर शहर पोलिसांनी याप्रकरणी कमलेश पवार व दीपक जाधव या दोघांना ताब्यात घेतले आहे. 


पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार कमलेश पवार श्रीरामपूर एसटी स्टँड समोरील पान टपरीवर उभा होता. तेथे सुनील कर्पे यांच्यासह आणखी एक तरुणा आला. पायावर पाय पडल्याच्या कारणावरून करपे व पवार यांच्यात वाद झाला. कमलेश पवार व त्याचा साथीदार दीपक जाधव यांनी करपे व त्याच्या मित्राला मारहाण केली. त्यात एकाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. 5 सप्टेंबर रोजी रात्री नऊ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. 


घटनेची माहिती मिळताच श्रीरामपूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांनी पोलीस पथक श्रीरामपूर एसटी स्टँडकडे रवाना केले. दोघा जखमींना उपचारासाठी साखर कामगार रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यातील एकाची प्रकृती गंभीर असल्याने त्याला लोणी येथील प्रवरा रुग्णालयात हलविण्यात आले. या प्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या कमलेश पवार आणि दीपक जाधव या दोघांवरही चोरी, हाणामारी या प्रकारातील काही गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या