परभणी :
उसनवारीने घेतलेले पैसे परत न केल्याने एकाला आपला अल्पवयीन भाऊ गमवावा लागला आहे. आरोपींनी या अल्पवयीन मुलाचे अपहरण केले होते. त्यानंतर त्याची हत्या केली. पोलिसांनी या प्रकरणी दोन आरोपींना अटक केली आहे.
परभणीच्या पुर्णा तालुक्यातील माटेगाव येथील प्रकाश बोबडे यांच्या 14 वर्षीय लहान मुलाचे गुरुवारी दुपारी अपहरण करण्यात आले होते. याबाबत पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. पोलिसांनी अल्पवयीन मुलाच्या शोधासाठी विविध तपास पथके नियुक्त करण्यात आले. पोलिसांनी केलेल्या तपासात बालाजी चव्हाण आणि नरेश जाधव या दोन तरुणांची नावे समोर आली. दोन्ही आरोपी पसार असल्याचे समजल्यानंतर पोलिसांनी त्यांनी शिताफीने अटक केली. या दोन तरुणांनी 14 वर्षीय बालकास त्याचा मोठा भाऊ पैसे देत नसल्याचा राग मनात ठेवला होता. या रागातून त्यांनी 14 वर्षीय अल्पवयीन मुलाला मारहाण केली. त्यानंतर त्यांनी हात-पाय आणि तोंड बांधून नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील माळेगाव येथे नेले. त्याच ठिकाणी त्याला संपवलं आणि त्याचा मृतदेह टाकून पसार झाले असल्याची माहिती समोर आली.
पोलिसांनी मोठ्या शिताफीने या दोन्ही तरुण आरोपीस अटक केली आहे. केवळ 35 हजार रुपयांसाठी या दोन जणांनी 14 वर्षीय बालकास अपहरण करून त्याची हत्या केल्याने जिल्हाभरात मोठी खळबळ उडाली आहे.
0 टिप्पण्या