चितळी विभागातील सर्व पाझर तलाव पूर्ण क्षमतेने भरून मिळावे, शेतकर्‍यांचे पाटबंधारे विभागास निवेदन

 उजव्या तटाच्या अंतर्गत येणारे चितळी विभागातील सर्व पाझर तलाव पूर्ण क्षमतेने भरून मिळावे

शेतकर्‍यांचे पाटबंधारे विभागास निवेदन




चितळी: प्रविण दरंदले 



 राहाता तालुक्यातील चितळी- जळगाव सर्व विभागातील कोरडे पडलेले पाझर तलाव भरून मिळणेबाबत पाटबंधारे विभाग,गोदावरी उजवा तट कालवा शाखा कार्यालयास चितळी विभागातील सर्व लाभधारक शेतकर्‍यांनी चितळी पाटबंधारे विभागाचे शाखाधिकारी अविनाश जाधव यांच्याकडे निवेदन दिले आहे.

 या पत्रकात म्हटले आहे की;चितळी,जळगाव,गोंडगाव, एलमवाडी,रामपूरवाडी व टेलला येणारे परिसरातील सर्व पाझर तलाव व गणेश बंधारे त्वरित भरून मिळावेत अशी मागणी शेतकर्‍यांनी पत्रकात केली आहे राहाता तालुक्यात ऐन पावसाळ्यात तीन महिन्यापासून पावसाने उघडीप दिली असल्याकारणाने उभी खरिपाची  असलेली सर्व पिके हातातूनच निघुन गेलीच आहेत परंतु जनावरांच्या चा-याचा व जनावरांचा पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झालेला आहे.निसर्गाच्या लहरीपणामुळे बळीराजा आधीच मेटाकुटीस आलेला आहे.तरी वरील सर्व विषयांची पाटबंधारे विभागाने दखल घेवून तातडीने या पंचक्रोशीतील सर्व पाझर तलाव पूर्ण क्षमतेने भरून दयावे अशी मागणी परिसरातील सर्व शेतकर्‍यांनी निवेदनात केली आहे.

यावेळी विक्रम वाघ,नारायणराव कदम,रविंद्र चौधरी,प्रविण चौधरी,विजय चौधरी,दत्तात्रय वाघ,बाळासाहेब वाघ,कैलास वाघ,सुभाष वाघ,विक्रम साबदे,नामदेव खरात,अनिल पवार,गणेश गोसावी,रामराव गायकवाड,संजय वाघ,आदींसह चितळी-जळगाव परिसरातील शेतकरी निवेदन देण्यासाठी उपस्थित होते.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या