छत्रपती संभाजीनगरमध्ये आज राज्य मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक पार पडली.. तब्बल ७ वर्षांच्या कालखंडानंतर ही बैठक झाली.
बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आणि उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत महत्वाच्या घोषणा केल्या.
यावेळी मुख्यमंत्री (EKnath Shinde) यांनी अनेक मोठ्या घोषणा केल्या. मराठवाड्यातील जनतेला दिलासा देण्यासाठी ही बैठक झाल्याचे सांगत मराठवाड्याच्या विकासासाठी, मराठवाड्यातील लोकांना न्याय देण्यासाठीचे अनेक निर्णय बैठकीमध्ये घेतल्याचे ते म्हणाले.
महत्वाच्या घोषणा....
बैठकीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सिंचन प्रकल्पावर १४ हजार कोटी खर्च करणार असल्याचे सांगितले. तसेच सार्वजनिक बांधकामासाठी 12 हजार 938 कोटी, ग्रामविकासासाठी 1 हजार 191कोटी, कृषीविभागासाठी 709 कोटी, तसेच वैद्यकीय विभागासाठी 498 कोटी खर्च करणार असल्याची घोषणा केली. आजच्या बैठकीत मराठवाड्यासाठी ४५ हजार कोटींपेक्षा जास्त प्रकल्पांचा निर्णय झाल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. तसेच धाराशिव आणि छत्रपती संभाजीनगरही अधिकृत नावे केल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
0 टिप्पण्या