श्रीरामपूर-
मतमाऊली यात्रेच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक क्र.२ यांनी हरेगाव येथे अवैध देशी विदेशी दारू सह गावठी हातभट्टीवर छापा टाकून मोठ्या प्रमाणात दारू जप्त केली आहे.
राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक क्रमांक दोन यांना गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार हरेगाव परिसरामध्ये गावठी दारू वाहतूक करणारी दुचाकी वाहन पकडून त्यावर मधील सत्तर लिटर हातभट्टी गावठी दारू जप्त केली, तसेच देशी-विदेशी व हात भट्टी गावठी दारूची विक्री करणाऱ्या चार वेगवेगळ्या ठिकाणी छापे मारून असा एकूण 96 हजार 685 रुपये किमतीचा मुद्देमाल वाहनासह जप्त करण्यात आला या कारवाईत पाच इसमांना ताब्यात घेतले, असून त्यांच्याविरुद्ध दारूबंदी कायदा 1949 अन्वय गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई विभागीय उपायुक्त राज्य उत्पादन शुल्क मोहन वर्दे, अहमदनगर विभागाचे अधीक्षक प्रमोद सोनाने,उपाधीक्षक सुजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक गोपाल चांदेकर, दुय्यम निरीक्षक व्ही. एम. आभाळे, जी.एम .नायकोडी, सहाय्यक दुय्यम निरीक्षक के.के. शेख, एस. डी. साठे जवान तोफिक शेख, स्वाती फटांगरे, निहाल शेख यांनी ही कारवाई केली.
0 टिप्पण्या