विशेष पोलीस महानिरीक्षक बी जी शेखर पाटील यांच्या हस्ते बेस्ट डिटेक्शन अवॉर्ड स्वीकारताना पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी. समवेत पोलीस अधीक्षक राकेश ओला |
विशेष पोलिस महानिरीक्षक बी. जी. शेखर पाटील यांनी केला पोलिस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांचा सन्मान
------------------------------श्रीरामपूर ः
दाखल गुन्ह्यांचा तपास करून गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यात श्रीरामपूर शहर पोलिस जिल्ह्यात अव्वल ठरले आहेत. गेल्या वर्षभरात शहर पोलिसांनी चोरी, दरोड्याच्या तब्बल 91 गुन्ह्यांचा शोध लावला असून जुगार आणि दारुबंदीच्या एकूण 491 केसेस केल्या आहेत. तसेच गोवंशीच्या जनावरांच्या कत्तलीची 24 गुन्हे दाखल केले. या सर्व गुन्ह्यातील सुमारे 95 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. याशिवाय आर्म अॅक्टनुसार 21, गांजा बाळगल्याप्रकरणी 19 गुन्हे दाखल केले आहेत. 17 जणांवर हद्दपारीची तर दोघांवर एमपीडीए कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आली. श्रीरामपूर शहर पोलिसांच्या या कामगिरीबद्दल त्यांना जिल्ह्यात बेस्ट डिटेक्शन पुरस्काराने गौरविण्यात आले. नाशिक विभागाचे विशेष पोलिस महानिरीक्षक बी. जी. शेखर पाटील यांच्या हस्ते पोलिस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांनी हा पुरस्कार स्विकारला.
नगर जिल्हा हा हल्ली गुन्हेगारीचे केंद्र बनत आहे. त्यात श्रीरामपूर तालुका मोठे हॉटस्पॉट आहे. सामाजिक आणि धार्मिक संवेदनशील असलेल्या या तालुक्यात सामाजिक शांततेेसाठी पोलिसांची भूमिका महत्वाची असते. त्यात शहर पोलिसांनी सामाजिक शांतता प्रस्थापित करण्यात यश मिळविले. त्याचबरोबर गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यातही जिल्ह्यात आघाडी घेतली आहे.
पोलिस अधिक्षक राकेश ओला, अपर पोलिस अधिक्षक स्वाती भोर आणि उपअधिक्षक डॉ. बसवराव शिवपूजे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक गवळी व शहर पोलिसांनी सप्टेंबर 2022 ते ऑगस्ट 2023 या वर्षभरात उत्तुंग अशी कारवाई केली. या कामगिरीबद्दल शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक गवळी यांच्यासह सर्व अधिकारी गुन्हे शोध पथक आणि सर्व पोलिसांचे कौतुक होत आहे.
गौरवास्पद कामगिरी
91 चोर्या-दरोड्यांचा शोध, 42 लाख 58 हजार 470 रुपयांचा मुद्देमाल जप्त
जुगार-दारुबंदीच्या 491 कारवाया, 54 लाख 6 हजार 430 रुपयांचा मुद्देमाल जप्त
24 गुन्हे दाखल करत 28 लाख 65 हजारांच्या गोवंशाची सूटका
12 लाख 50 हजारांचा मांगूर मासा नष्ट
बंदूका व तलवारी बाळगल्याप्रकरणी 21 कारवाया
गांजा बाळगणे व सेवनप्रकरणी 19 कारवाया इतर 53 महत्वाच्या कारवाया
0 टिप्पण्या