तीन वर्षानंतर उकलले गूढ; स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी
अटक केलेल्या पाच आरोपींसह स्थानिक गुन्हे शाखेचे पथक |
नगर : एकाच बाईचे दोघांशी अनैतिक संबंध असल्याने एकाने दुसऱ्याची सुपारी देऊन काटा काढला. पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी लुटमारीचा बनाव केला. हा प्रकार तब्बल तीन वर्षानंतर उजेडात आला. तडीपार असलेल्या आरोपींच्या मुसक्या आवळल्यानंतर त्याच्याकडे आढळलेल्या विनाक्रमांकाच्या मोपेड गाडीमुळे हे गुड उकलले. त्याला पकडताच त्याने इतर साथीदारांची ही नावे घेतली. स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी या प्रकरणी सहा आरोपींना अटक केली असून दोघे फरार आहेत.
दुर्दैवाने या गुन्ह्याची उकल झाली तत्पूर्वीच लूटमारीत ज्यांना मारहाण झाली होती. त्या संदीप मच्छिंद्र वाघ यांचा मृत्यू झालेला आहे. पोलिसांनी या प्रकरणी तडीपार आरोपी स्वप्निल सुनील वाघचौरे (वय 24, रा. प्रबुद्ध नगर, भिंगार), अशोक नामदेव जाधव (वय 40, रा. शाहुनगर, केडगांव), प्रताप सुनिल भिंगारदिवे ( वय 27), विशाल ऊर्फ झंडी लक्ष्मण शिंदे (वय 37 दोन्ही रा. सावतानगर, भिंगार), रविंद्र विलास पाटोळे (वय 33, प्रबुध्दनगर, भिंगार) यांना अटक केली आहे.
आगामी सण उत्सवांच्या काळात काही समाजविघातक मंडळी चुकीचे कृत्य करू नये, यासाठी पोलीस आरोपींवर लक्ष ठेवतात. तडीपार आरोपी पुन्हा जिल्ह्यात आल्यास त्यांची धरपकड केली जाते. असाच एक आरोपी स्वप्निल वाघचौरे भिंगार येथे त्याच्या घरी असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक दिनेश आहेर यांना मिळाली होती. त्यानुसार 5 सप्टेंबर रोजी पोलीस पथकाने स्वप्निल सुनील वाघचौरे याला त्याच्या घरून ताब्यात घेतले. त्याच्या घरासमोर विनाक्रमांथाची निळ्या रंगाची एव्हीएटर दुचाकी सापडली. त्याबाबत चौकशी केली असता ती चोरीची निघाली. सदर दुचाकी संदीप मच्छिंद्र वाघ यांची असल्याचे पोलीस चौकशीत समोर आले.
अशोक जाधव याने स्वप्निलला 70 हजार रुपयांची सुपारी देऊन संदीप वाघ मारण्यास सांगितले होते. त्यानुसार स्वप्निल ने इतर साथीदारांच्या मदतीने एक इको चारचाकी गाडी भाड्याने घेतली. केडगांव परिसरातील हॉटेल मैत्री जवळ संदीप मच्छिंद्र वाघ याचे डोक्यात व पायावर जबर मारहाण केली व त्याचे जवळील एव्हिएटर मोटार सायकल व रोख रक्कम चोरी केल्याची कबुली त्याने दिली. आरोपी अशोक जाधव व संदीप वाघ यांचे एका बाईशी अनैतिक संबंध होते. त्यातून हा हल्ला करून लूटमारीचा बनाव करण्यात आल्याचे आरोपींनी कबूल केले. पाचही आरोपींना वेगवेगळ्या ठिकाणाहून अटक करण्यात आली. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली इको कार व एव्हिएटर मोटार सायकल जप्त करण्यात आली आहे. आरोपींचे दोन साथीदार रविंद्र धिवर व संदीप पाटोळे फरार आहेत.
आरोपीने दिलेल्या कबुलीच्या अनुषंगाने अहमदनगर जिल्हा गुन्हे अभिलेख पडताळणी करता कोतवाली पोलीस स्टेशन गु.र.नं. 6272/2020 भादविक 397 प्रमाणे गुन्हा दाखल आहे.
यातील आरोपी स्वप्निल वाघचौरे व सुनील भिंगारदिवे हे दोघे हद्दपार होते. त्यांनी हद्दपार आदेशाचा बंद करून बेकायदेशीर रित्या नगर शहरात वास्तविक केल्याबद्दल कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्यातील सर्व आरोपीविरुद्ध आतापर्यंत विविध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.
पोलीस अधीक्षक राकेश ओला व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक तुषार धाकराव, सहाय्यक फौजदार भाऊसाहेब काळे, पोलीस हवालदार दत्तात्रय गव्हाणे, विश्वास बेरड, अतुल लोटके, देवेंद्र शेलार, पोलीस नाईक रविंद्र कर्डीले, पोलीस कॉन्स्टेबल अमोल कोतकर, भाऊसाहेब काळे, किशोर शिरसाठ, रणजीत जाधव, मेघराज कोल्हे, महिला पोलीस नाईक भाग्यश्री भिटे, ज्योती शिंदे, चालक उमाकांत गावडे व भरत बुधवंत यांच्या पथकाने ही कारवाई केली.
0 टिप्पण्या