Triple Murder : गुंड निखिल राजपूतची गळा चिरून हत्या... पाण्याच्या टाकीवर थरार..!

 साळुंके कुटुंबावर खुनी हल्ला...

दोघांचा मृत्यू; दोघे गंभीर..! 

हम्प्या खरात मर्डरनंतर पुन्हा भुसावळ हादरले! 



राज्याला हजर होणाऱ्या हम्प्या खरात खून खटल्यानंतर पुन्हा भुसावळ परिसर खळबळजनक हत्याकांडाने हादरला. सशस्त्र हल्लेखोरांनी एका कुटुंबावर केलेल्या हल्ल्यात दोघांचा मृत्यू झाला तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. तर दुसऱ्या घटनेत निखिल राजपूत या कुख्यात गुंडाचा गळा चिरून खून करण्यात आला. तो विविध गुन्ह्यात पोलिसांना हवा होता.

भुसावळ शहरापासून तीन कायम लांब कंडारी गाव आहे. रात्री 11 वाजण्याच्या सुमारास कंडारी परिसरात शांताराम भोलानाथ साळुंखे व राकेश भोलानाथ साळुंखे या दोन सख्ख्या भावांवर अज्ञातांनी चाकूने व तलवारीने वार केले. या घटनेमध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर हा प्रकार घडल्यानंतर काही तासाच्या आतच श्रीराम नगर परिसरात कुविख्यात गुन्हेगार निखिल राजपूत याच्यावर अज्ञातांनी वार केले. निखिल राजपूतच्या गळ्यावर वार करत त्याची हत्या करण्यात आली. निखिल त्याच्या घराच्या परिसरातील पाण्याच्या टाकीवर झोपला होता. त्याच्या समवेत आणखी काही संशयित होते. त्यांच्यात वाद होऊन झटापट झाली. त्यावेळी एका आरोपीने निखिलचा गळा चिरला. विशेष म्हणजे हत्येपूर्वी काही तास आधी निखिलने पोलिसांवर देखील हल्ला केला होता. त्याचाही स्वतंत्र गुन्हा दाखल झाला होता. नितीन राजपूतची हत्या कौटुंबिक वादातून झाल्याची चर्चा आहे. 

या तिहेरी हत्याकांडाने भुसावळ शहर हादरलं असून भुसावळ शहर पोलीस व बाजारपेठ पोलिसांकडून मारेकऱ्यांचा शोध सुरू आहे.

घटनास्थळी तालुका पोलिस ठाण्याचे परिविक्षाधिन अधिकारी सतीष कुलकर्णी तसेच शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक गजानन पडघन व कर्मचारी पोहचले असून, परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासणी सुरू आहे. दरम्यान, या दुहेरी खुनामागील नेमके कारण अद्याप समजू शकले नसून, पोलिस तपास करीत आहे.. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या