Murder : प्रसिद्ध उद्योजक बियानी यांच्यावर गोळ्या झाडणारा जेरबंद

   

 


प्रोफेशनल शूटर दीपक रंगा याला 21 सप्टेंबरपर्यंत कोठडी 


प्रसिद्ध उद्योजक संजय बियाणी हत्याकांडाच्या तपासासाठी नांदेड पोलिसानी दीपक रंगा याला ताब्यात घेतले. आज त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला 21 सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली. 

नांदेड पोलिसांनी पंजाब येथील कारागृहातून एका आरोपीला ताब्यात घेतले आहे. दिपक उर्फ दिपुना उर्फ सुनिल सुरेशकुमार रंगा (२३) रा.सुरखपुर ता.जि.झज्जर, राज्य हरियाणा, असं या आरोपीचे नाव आहे.


प्रसिद्ध उद्योजक संजय बियाणी यांची 5 एप्रिल 2022 रोजी दिवसाढवळ्या त्यांच्या राहत्या घरासमोर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. खंडणीच्या कारणावरुन हरविंदर सिंह रिंदा याच्या साथीदाराने त्यांची गोळ्या घालून हत्या केली होती. त्यामुळे राज्यभरात खळबळ उडाली होती. तत्कालीन गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी बियाणींच्या घरी भेट देऊन कुटुंबीयांचे सांत्वन केले होते. तर दुसरीकडे रिंदाच्या दहशतीमुळे नांदेड शहरातील अनेक मोठे व्यावसायिक, व्यापारी यांनी स्थलांतराची तयारी केली होती. 

संजय बियाणी यांच्यावर हरविंदर सिंह रिंदा याच्या सांगण्यावरुन गोळीबार करण्यात आला होता. गोळीबार करणाऱ्या दोन शूटरपैकी एकाला पोलिसांनी ताब्यात घेतले. 


या प्रकरणी पोलिसांनी आता पर्यंत मुक्तेश्र्वर उर्फ गोलु विजय मंगनाळे, सतनामसिंघ उर्फ सत्ता दलबिरसिंघ शेरगिल, इंद्रपालसिंघ उर्फ सन्नी तिरकसिंघ मेजर, हरदिपसिंघ उर्फ सोनू पिनीपाना सतनामसिंघ बाजवा, गुरमुखसिंघ उर्फ गुरी सेवासिंघ गिल, करणजितसिंघ रघबिरसिंघ शाहू, हरदिपसिंघ उर्फ हर्डी उर्फ लक्की बबनसिंघ सपुरे, कृष्णा उर्फ पप्या धोंडीबा पवार, हरीश मनोज बाहेती, रणजित सुभाष मांजरमकर, सरहानबिन अली अलकसेरी, गुरप्रितसिंघ उर्फ दान्या उर्फ सोनी गुलजारसिंघ खैरा, कमलकिशोर गणेशलाल यादव, सुनिल उर्फ दिपक पिता सुरेश, दिव्यांश उर्फ पहेलवान रामचेत यांना अटक केली आहे.


बियाणी यांच्यावर गोळीबार केल्यानंतरदिपक रांगा हा फरार होता. आठ महिन्यापूर्वी एनआयएने दिपक रांगा याला नेपाळ बॉर्डर वरुन अटक केली होती. ९ मे २०२२ रोजी आरोपीने पंजाब पोलिसांच्या गुप्तहेर विभाग कार्यालयावर बॉम्बने हल्ला केला होता. या प्रकरणी एनआयएने २२ जानेवारी २०२३ रोजी अटक केली होती. रविवारी चंढीगड कारागृहातून आरोपी दिपक रांगा याला नांदेड पोलिसांच्या ताब्यात घेतले. आज आरोपीला नांदेड न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने १२ दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान मुख्य शूटर अटक झाल्याने संजय बियाणी खून प्रकरणातील नवी माहिती समोर येणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या