14 वर्षीय मुलीची आपबीती
वैजापूर
एका अल्पवयीन 14 वर्षीय मुलीचा वर्षभरापासून लैंगिक छळ करणाऱ्या सावत्र बापासह त्याच्या मित्राला येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने 20 वर्ष सक्त मजुरी व प्रत्येकी 10 हजार रुपये दंड तर याच प्रकरणात आरोपी असलेल्या पीडितेच्या आईला देखील न्यायालयाने एक वर्ष कारावसाची शिक्षा ठोठावली. सतीश कनगरे रा. मोंढा मार्केट असे शिक्षा सूनविण्यात आलेल्या बापाच्या आरोपी मित्राचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, या घटनेतील पीडित अल्पवयीन 14 वर्षीय मुलगी ही छ. संभाजीनगर येथील एका वसतीगृहात शिक्षण घेत होती. परंतु तिच्या पायाची शस्त्रक्रिया झाल्यामुळे ती शहरातील मोंढा मार्केट परिसरातील तिच्या आईकडे राहण्यासाठी आली होती. त्यामुळे ती गेल्या वर्षभरापासून येथे वास्तव्यास होती.
परंतु तिच्या सावत्र बापाची तिच्यावर वाईट नजर होती. तो तिच्यासोबत अश्लील चाळे करीत असत. एवढेच नव्हे तर शेजारी राहणारा एकजणही तिचा लैंगिक छळ करीत. सावत्र बापासह शेजारी मुलीशी शय्यासोबत करू लागल्याने आपबीती सांगावी तरी कुणाला ? असा प्रश्न तिला पडला. त्यामुळे तिने धाडस करून ही सुरू असलेला प्रकार आपल्या आईला सांगितला. परंतु झाले उलटेच. तिनेही मुलीची साथ न देता शेजारील अत्याचार करणारा जसे सांगतो, तसे कर. असे सांगून पीडित मुलीलाच मारहाण केली. हा प्रकार एवढ्यावरच थांबला नाही तर बापाने नीचतेच्या सर्व सीमा पार केल्या . दरम्यान 24 ऑक्टोबर 2021 रोजी बापानेच तिच्या गुप्तांगात मिरची पूड टाकून क्रौर्याची सीमा गाठली. तिला त्रास होऊ लागल्याने ती शहरातील लक्ष्मीनगर परिसरातील तिच्या मावशीकडे पळून गेली. ती मावशीकडे गेल्यानंतर त्यांचा शेजारी तिचा पिच्छा सोडायला तयार नाही. त्याने दुसऱ्यांना दुचाकी घेऊन तिला आणण्यासाठी वारंवार मावशीकडे पाठविले. परंतु तिच्या मावशीने त्यांना पिटाळून लावले. परंतु त्याची दादागिरी थांबायला तयार नसल्यामुळे पीडितेसह तिच्या मावशीने 01 नोव्हेंबर 2021 रोजी वैजापूर पोलिस ठाण्यात जाऊन फिर्याद दिली. हा घृणास्पद प्रकार ऐकून पोलिस यंत्रणाही चक्रावून गेली. याप्रकरणी पीडित मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून सावत्र बापासह आई व अशा तिघांविरुद्ध बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यासह विविध कलमान्वये वैजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी गुन्ह्याचा तपास करून आरोपींविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सदर खटल्या दरम्यान सरकारी वकील ऍड नानासाहेब जगताप यांनी सरकार पक्षातर्फे कामकाज पाहिले.
दरम्यान ही घटना उघडकीस आल्यानंतर शहरातील समाजमन सुन्न झाले. पीडितेवर सावत्र बापाने अत्याचार करणे ही बाब कधीच समर्थनीय होऊ शकत नाही. परंतु त्यापेक्षाही भयावह सत्य म्हणजे या कृत्यासाठी सख्या आईने दर्शविलेली सहमती हा प्रकार जास्त घृणास्पद म्हणावा लागेल. वासनांध बापाने पवित्र नात्याची कोणतीही तमा न बाळगता मुलीवर अत्याचार करून या नात्यालाच तिलांजली दिली. त्यात आईने चुप्पी साधून दर्शविलेला होकार हा तर नात्याच्या सर्वच हद्दी पार करणारा ठरला.
0 टिप्पण्या