सिद्धिविनायक न्यासाचे अध्यक्ष अभिनेते आदेश बांदेकर भारावले.... अनुराधाताई आदिक यांचे कौतुक
श्रीरामपूर : श्रीरामपुरात दसऱ्याच्या अगोदरच दिवाळी झाली. अनुराधाताई आदिकांनी श्रीरामपूरकरांना ही संधी उपलब्ध करून दिली. मी तर हे वातावरण बघून भारावून गेलो आहे, असे भावोद्गार सिद्धिविनायक न्यासाचे अध्यक्ष अभिनेते आदेश बांदेकर यांनी व्यक्त केले.
नगराध्यक्ष अनुराधा आदिक मित्र मंडळाच्या वतीने आदेश बांदेकर प्रस्तुत खेळ मांडीयेला ,नवदुर्गांचा सन्मान व सत्कार या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अविनाश आदिक, पुष्पलता आदिक, अंजली आदिक -पुनातर यांच्यासह नवदुर्गा व्यासपीठावर उपस्थित होत्या. पुढे बोलताना बांदेकर म्हणाले हा कार्यक्रम आयोजित करून येथील प्रेक्षकांसाठी एक संधी उपलब्ध करून दिली आहे येथील नागरिकांनी ही विशेषतः महिला भगिनींनी मोठ्या उत्साहात कार्यक्रमाला हजेरी लावली आहे हे सर्व बघून मी भारावून गेलो आहे असे ते म्हणाले
नगराध्यक्ष अनुराधा आदिक मित्र मंडळाच्या वतीने सालाबाद प्रमाणे याही वर्षी नवरात्र उत्सवानिमित्त समाजामध्ये विविध घटकांमध्ये योगदान देणाऱ्या महिलांचे सन्मान आणि सत्कार करण्यात येतात यावर्षी यामध्ये डॉ. वर्षा आगाशे, हर्षदा ताई पंडित, प्रमिलाताई लबडे, चंद्रकलाताई डोळस ,डॉ वैशालीताई कापसे ,विजयताई जमदाडे ,कुसुमताई गायके ,ममता कांकरिया,डॉ. शिजा शेख या नवदुर्गांना सन्मानित करण्यात आले यावेळी आदेश बांदेकर यांनी महिलांमध्ये जाऊन त्यांना विविध प्रश्न विचारले यामध्ये प्रथम येणाऱ्या तीन महिलांना पैठणी भेट देण्यात आली यामध्ये जयश्री जयवंत वाकळे सुवर्णा धनंजय शिंगारे अमृता वैभव जैत या भाग्यवान विजेता ठरल्या तसेच 300 महिलांना विविध प्रकारची देण्यात आली कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत अनुराधाताई आदिक यांनी केले. यावेळी 2022 च्या नवदुर्गा, सुजाता मालपाठक, सुजाताई शेडगे, मंगल ताई आढाव ,ज्योतीताई पवार, श्वेता गुलाटी, डॉ प्रेरणा शिरसाठ ,सिस्टर मेरी जेन्सिया ,पिंकी गुरु ,वंदना पवार यांच्या हस्ते 2023 च्या नवदुर्गांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी अविनाश आदिक यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिल सदस्या मीनाताई जगधने, डॉ. रवींद्र जगधने, डॉ.कापसे, नगरसेवक प्रकाश ढोकणे, राजेंद्र पवार ,भाऊसाहेब डोळस, नागेश सावंत, तिलक डुंगरवाल, डॉ. बापूसाहेब आदिक, अर्जुन आदिक,राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष कैलास बोर्डे, शहराध्यक्ष अभिजीत लिपटे ,जयंत चौधरी, भैय्या भिसे, माजी आ भाऊसाहेब कांबळे ,विशाल मोजे, तोफिक शेख ,संदीप चोरगे डॉ रवींद्र महाडिक, नितीन गवारे, किशोर बकाल ,सुभाष यादव ,प्रशांत खंडागळे, संदीप गवारे, संजय गवारे गोपाल वायनदेशकर ,सैफ शेख ,सुधाकर बोंबले ,राहुल बोंबले, अभिषेक गुलदगड, रोहित घोरपडे ,अनिरुद्ध भिंगारवाला, रंजन वावळ ,शुभम पवार उदय साबळे सुनील थोरात अविनाश नागरे समित मुथा,हेमंत मोहिते ,अर्चनाताई पानसरे, निशा थोरात ,संगीता फासाटे, ऋचा पानसरे, शितल बोर्डे, ऐश्वर्या पवार ,प्रियंका जनवेजा ,सोनल मुथा,वंदना आदिक, छायाताई आदिक, सारिका आदिक, स्वाती छल्लारे मंजुश्री गलांडे, शशिकला लिपटे आदि मान्यवर उपस्थित होते.
0 टिप्पण्या