महानगरपालिकेच्या कार्य पद्धतीमुळे शहर विकासाला खीळ ; खा.डॉ.सुजय विखे पाटील

 

खा. डॉ. सुजय विखे पाटील यांच्या प्रयत्नातून व नगरसेवक मनोज कोतकर यांच्या पाठपुराव्यातून केडगाव देवी श्री रेणुका माता देवस्थान मंदिर परिसर सुशोभीकरण कामाचा शुभारंभ संपन्न


नगर : 


सर्वसामान्य आई-वडिलांच्या मुलांचे एमपीएससी यूपीएससीचे स्वप्न पूर्ण व्हावे यासाठी सावेडी बसस्थानक येथे 25 कोटी रुपये खर्च एसी लायब्ररीचे काम करणार आहेयामध्ये आठशे मुले एकाच वेळी अभ्यास करू शकतात. महिलांचे आर्थिक सक्षमीकरण करण्यासाठी बचत गटांना आर्थिक मदत देऊन हाताला काम देण्यात येणार आहे. 


विकास कामांसाठी पक्षीय राजकारण बाजूला ठेवून आ.संग्राम जगताप व मी शहर विकासासाठी एकत्र आलो आहोत. निधी कमी पडून दिला जाणार नाही अहमदनगर महानगरपालिकेची कार्य पद्धती बदलली पाहिजे. याचबरोबर छाननी समिती बंद केली पाहिजेएक काम पूर्ण होण्यासाठी एक-एक वर्ष लागतात अशी मनपा मी कुठेच पाहिली नाहीमहानगरपालिकेच्या कार्य पद्धतीमुळे शहर विकासाला खीळ बसत आहे. त्यामुळे कार्यपद्धती बदलणे काळाची गरज आहेउड्डाणपूल व बायपासचे काम 18 महिन्यात पूर्ण केले आहे.


 केडगावच्या विकासासाठी निधी कमी पडून दिला जाणार नाही. निवडणुकीच्या काळामध्ये नागरिकांनी सुशिक्षित व आर्थिक सक्षम असणाऱ्या उमेदवाराला निवडून द्यावेजेणेकरून विकास कामांमध्ये टक्केवारी घेतली जाणार नाहीत्यामुळे विकासाच्या कामांना गती मिळून दर्जेदार कामे मार्गी लागली जातीलनगरसेवक मनोज कोतकर हे विकास कामांसाठी पाठपुरावा करणारे नगरसेवक म्हणून ओळखले जात आहे तसेच माजी महापौर संदीप कोतकर यांनी केडगावच्या विकासाला चालना दिली. जिथे बैलगाडी जात न्हवती तिथे फोर्च्युनर गाडी जायला लागली असे दर्जेदार रस्ते माजी महापौर संदीप कोतकर यांनी केले आहेत असे प्रतिपादन खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांनी केले.
 
      खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांच्या प्रयत्नातून व नगरसेवक मनोज कोतकर यांच्या पाठपुराव्यातून केडगाव देवी श्री रेणुका माता देवस्थान मंदिर परिसर सुशोभीकरण कामाचा शुभारंभ संपन्न झालायावेळी खासदार डॉ. सुजय विखे पाटीलआमदार संग्राम जगतापउद्योजक सचिन कोतकरनगरसेवक मनोज कोतकरमाजी नगरसेवक सुनील मामा कोतकरमाजी नगरसेवक सुनील कोतकरनगरसेवक राहुल कांबळेनगरसेविका लताताई शेळकेगौरी ननवरेमहेंद्र कांबळेभूषण गुंडजालिंदर कोतकरबच्चन कोतकररामदास येवलेधनंजय जामगावकरपंकज जाहागीरदारमहेंद्र कांबळेयांच्यासह प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
    
आमदार संग्राम जगताप म्हणाले कीकेडगाव देवी श्री रेणुका माता देवस्थान हे भाविकांचे श्रद्धास्थान आहे नवरात्र उत्सवानिमित्त या ठिकाणी राज्यभरातील भाविक दर्शनासाठी येत असतात. सध्या राजकीय स्टंट करणाऱ्यांची संख्या खूप वाढली आहे. आता राज्य सरकार हे महायुतीचे असून नगर शहर उपनगराच्या विकास कामे करण्यासाठी निधी आणणार आहेकेडगावच्या विकासाला खऱ्या अर्थाने गती मिळाली आहे असे ते म्हणाले.
   
सचिन कोतकर म्हणाले कीकेडगाव उपनगरासाठी आमदार व खासदार यांच्या माध्यमातून विकास कामे सुरू आहे मात्र काही रस्ते अत्यंत खराब झाली असून त्यासाठी दहा कोटी रुपयाचे पॅकेज द्यावे. आमदारखासदार यांनी विकास कामे करण्यासाठी कायमस्वरूपी एकत्र रहावे असे ते म्हणाले.



    
नगरसेवक मनोज कोतकर म्हणाले कीआमदारखासदार या राम लखन जोडीने मागितलेले सर्व कामे दिले आहेतया पुढील काळातही राहिलेल्या विकास कामांसाठी निधी द्यावादोन पक्षाचे नेते विकासासाठी एकत्र येतात. तेव्हा विकासाची कामे नक्कीच मार्गी लागतात. मंदिर परिसराच्या विकासासाठी 22 कोटी रुपयांची आवश्यकता आहे. हे काम लोक वर्गणीतून मार्गी लागणे शक्य नाही तरी आमदार खासदार यांनी मदत करावी,    खा. सुजय विखे पाटील यांनी मंदिराच्या सुशोभीकरणासाठी 50 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. 


विकास कामे करण्यासाठी पाठपुराव्याची आवश्यकता असतेयासाठी मी आमदार संग्राम जगताप व खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्याकडे सततच्या पाठपुरावा केल्यामुळे मोठा निधी उपलब्ध झाला आहे. टप्प्याटप्प्याने प्रभागातील सर्वच विकास कामे मार्गी लावली जातीलतसेच दळणवळणासाठी अत्यंत महत्वाचा असलेला अरणगाव रेल्वे क्रॉसिंग भुयारी मार्गाचा प्रश्न खा. सुजय विखे पाटील यांनी मार्गी लावला तसेच आमदार संग्राम जगताप यांनी समतानगर व शास्त्रीनगर भागातील ओढ्यातील रस्त्याच्या कामासाठी निधी उपलब्ध करून दिला आहे असे ते म्हणाले.



 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या