आ. लंकेंच्या सामाजिक कार्याची पुण्याच्या रॅडऑन रायडर्सला भुरळ




  २८ जणांच्या टिमने घेतली पारनेमधे भेट


पारनेर  :

मोटारसायकल रायडर्सचा भारतातील सर्वात मोठा संच म्हणून ओळख असलेल्या पुण्याच्या रॅडऑन रायडर्सच्या सदस्यांना आ. नीलेश लंके यांच्या सामाजिक कामाची भुरळ पडली असून रविवारी या ग्रुपच्या २८ सदस्यांनी मोटारसायकल राईड करत पारनेर येथे येउन आ. नीलेश लंके यांची भेट घेतली. 


       या ग्रुममार्फत आयोजित करण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांचे नियोजन करण्यासाठी ३३ जणांनी कमिटी असून ग्रुपच्या कॅप्टन महिला आहेत. ग्रुपमध्ये पुरूषांबरोबरच महिलांचाही समावेश आहे. या ग्रुपला र्टेडमार्क आणि आयएसओ मानांकनही मिळाले असून दर रविवारी वेगवेगळया ठिकाणांना हा ग्रुप भेेटी देऊन सामाजिक उपक्रम राबवितो.आश्रमशाळा तसेच वेगवेगळया भागांतील महिला व इतर गरजूंना मदत करण्यास प्राधान्य दिले जाते. 


      या ग्रुपच्या प्रमुख संस्थापकांमध्ये डॉ. किशोर शिंदे, अ‍ॅड.नरेश शेळके, कॅप्टन स्मिता म्हस्करेन्स, अफझल हयात हे असून अक्षय विसपुते, भाग्येश क्षिरसागर, बापू गायकवाड, जेरी डिकु्रझ, सचिन तलवार, जयेश जगताप हे कमिटी मेंंबर्स आहेत. 


      आमदार निलेश लंके हे गेल्या अनेक वर्षांपासून विविध सामाजिक उपक्रम राबवून गरजूंना मदतीचा हात देत असून त्यांच्या या सेवाभावी स्वभावामुळे राज्यातच नव्हे तर देशात त्यांची एक वेगळी प्रतिमा तयार झाली आहे. कोरोना काळात शरदचंद्र आरोग्य मंदिराच्या माध्यमातून आ. लंके यांनी हजारो रूग्णांना जीवदान दिले. स्वतः कोरोना रूग्णांमध्ये राहून त्यांनी त्यांचा आत्मविश्‍वास वाढविला. त्यामुळे त्यांच्या कोव्हीड सेंटरमध्ये एकाही कोरोना रूग्णाचा मृत्यू झाला नाही. विविध सामाजिक कामांमुळे प्रभावीत झालेल्या या तरूणांनी रविवारी पारनेरात येत आ. लंके यांची भेट घेत त्यांच्या विविध सामाजिक कामांची माहिती घेतली. 


६ हजार ५०० कि.मी. चा प्रवास 

या ग्रुपने मे व जुन महिन्यात पुणे ते लडाख असा ६ हजार ५०० किलोमिटरचा प्रवास करीत मेंटर अवेअरनेस हा सामाजिक मुद्यावर प्रवासादरम्यान प्रबोधन केले. 

या तरूणांनी आणलेल्या महागडया दुचाकीवरून राईड मारण्याचा मोह आ. लंके यांनाही आवरला नाही. सुमारे २० लाख रूपये किंमतीच्या दुचाकीवरून आ. लंके यांनी राईड मारीत या तरूणांना प्रोत्साहन दिले. सुरक्षितेची कशी काळजी घेता तसेच राईडबाबतची इतर माहितीही आ. लंके यांनी घेतली. 

या तरुणांनी आ. लंके यांनी आस्थेने विचारपुस करीत सकाळी कधी निघाले, नास्ता झाला का ? जेवणाची काय व्यवस्था आहे ? मी व्यवस्था करु का अशी विचारपूस करीत आ. लंके यांनी या सदस्यांचा सन्मानही केला. 

पुण्याच्या रॅडऑन रायडर्स ग्रुपने पारनेरचे आ.निलेश लंके यांची भेट घेत त्यांच्या सामाजिक कार्याची माहिती घेतली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या