मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना समज देण्याची गरज ; मनोज जरांगेंचा सरकारवर हल्लाबोल

 छगन भुजबळानीं केला सत्तेचा गैरवापर 

मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना समज देण्याची गरज

मनोज जरांगेंचा सरकारवर हल्लाबोल



वैजापूर :


अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी सत्तेचा गैरवापर सुरू केला असून ते कार्यकर्त्यांना पुढे सामाजिक वातावरण बिघडू पाहत आहेत. त्यांच्यामुळेच वातावरण बिघडलं असून मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी त्यांना समज देण्याची गरज आहे. असे सांगून मराठ्यांना आरक्षण मिळाल्याशिवाय आता हा लढा थांबणार नाही. आरक्षणाच्या आड याल तर याद राखा. असा सज्जड दमच मनोज जरांगे यांनी भरला. सकल मराठा समाजाच्यावतीने 9 ऑक्टोबर रोजी वैजापूर शहरातील स्टेशन रस्त्यावरील पंचायत समिती कार्यालयासमोर आयोजित सभेत ते बोलत होते. 

   
    मनोज जरांगे यांनी आपल्या 30 मिनिटांच्या भाषणात छगन भुजबळ यांना 'लक्ष्य' करीत त्यांच्यावर आसूड ओढले. ते म्हणाले की, सरकारला मराठा आरक्षण देण्यात आलेली 40 दिवसांची मुदत आता संपत आली आहे. त्यामुळे प्रतीक्षा आहे ती सरकारच्या निर्णयाची. उन असो की पाऊस, हा लढा आता थांबणार नाही. समाजाच्या लेकरांसाठी ही आरपारची लढाई आहे. परंतु असे असले तरी कुठेही गालबोट न लागता  आंदोलन यापुढेही सुरूच राहील. आम्ही सरकारला वेळ दिला नव्हता, सरकारनेच वेळ मागून घेतला होता. ती वेळही आता संपत आली आहे.

 समाजाच्या एकाही मुलाने आत्महत्येचा मार्ग पत्करू नाही. तुम्ही आत्महत्या करणार असाल तर मग आरक्षण मागायचे कुणासाठी ? असा प्रश्न उपस्थित करून आरक्षणाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संवेदनशील भूमिका घ्यावी. गेल्या अनेक वर्षांपासून हा लढा सुरू आहे. त्यामुळे आता संधी सोडणार नाही. असे सांगून छगन भुजबळ यांच्याबद्दल गेल्या चार दिवसांत मी 'ब्र' शब्द काढलेला नाही. परंतु वैजापूर येथे आल्यानंतर कळाले की ' पोलिसांनी आयोजकांना नोटीस दिल्या'. भुजबळ आता कार्यकर्त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून सामाजिक सलोखा बिघडविण्याचा प्रयत्न करीत आहेत. ते जरी म्हणत असले की,  मराठा आरक्षणाला आमचा विरोध नाही. परंतु असे असले तरी 'आमचं अन् तुमचं घर एकच पण एकटेच 35 टक्के खाताय' असा टोलाही जरांगेंनी लगावला.


 भुजबळांच्या सत्तेच्या गैरवापरामुळे वातावरण बिघडलं आहे. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी त्यांना समज देण्याची गरज आहे. कायदा व सुव्यवस्था बिघडली तर त्याला जबाबदार सरकार राहील. असे ते म्हणाले. दरम्यान 14 ऑक्टोबर रोजी आंतरवली सराटी येथे होणाऱ्या सभेसाठी समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहवे. सभेला येताना शांततेत येऊन काही गालबोट लागेल. अशी कृती न करण्याचे आवाहन जरांगे यांनी यावेळी केले. सभेस शहरासह तालुक्यातील समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होता.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या