मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या सदावर्तेचा पुतळयाचे दहन,



मराठा आरक्षण लढयाला पाठिंबा म्हणून नेवासा येथे चक्री उपोषण सुरू

अठरापगड जातींच्या लोकांचा पाठिंबा,

मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या सदावर्तेचा पुतळयाचे दहन,

सरकारचा निषेध म्हणून युवकांनी केले मुंडन


नेवासा :  प्रतिनिधी

मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या आमरण उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी नेवासा येथे खोलेश्वर गणपती चौकत चक्री उपोषण सुरु  करण्यात आले आहे.

या उपोषणाला अठरापगड  जातींच्या लोकांनी येथे येऊन पाठिंबा दिला व उपोषणात सहभाग ही नोंदवला.मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या अँड.सदावर्ते यांच्या पुतळ्याचे दहन करून सरकारचा निषेध म्हणून युवकांनी मुंडन केले
      जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब वाघ यांचे हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार करण्यात येऊन या उपोषणाला प्रारंभ करण्यात आला.जेष्ठ विधि तज्ञ अँड.के.एच.वाखुरे,भाऊसाहेब वाघ,संदीप आलवणे हे प्राणांतिक उपोषण करीत आहेत तर अनिल ताके, दीपक धनगे हे साखळी उपोषण करीत आहे.नेवासा शहर व तालुक्यातील विविध संघटनांचे पदाधिकाऱ्यांनी उपोषणस्थळी भेट देऊन पाठिंबा देणारी पत्रे उपोषण नेतृत्व करणाऱ्यांकडे सुपूर्त  केली,वेगवेगळ्या समाजाचे शेकडो नागरिकांनी यावेळी हजेरी लावून पाठिंबा दर्शवला.


       यावेळी मराठा आंदोलनाला विरोध करणाऱ्या गुणरत्न सदावर्ते याचा पुतळा जाळून निषेध व्यक्त करण्यात आला तर सरकारचा निषेध म्हणून प्रकाश निपुंगे,संजय मारकळी, गणेश चौगुले व  इतरांनी मुंडन करून घेतले.नेवासा पंचायत समितीच्या माजी सभापती सुनिताताई गडाख यांनी उपोषण स्थळी भेट देऊन पाठिंबा दर्शवला.


         नेवासा तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांना यापूर्वी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की आंतरवाली सराटी, जिल्हा जालना येथे मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी आमरण उपोषण क पुरेशी संधी देउनही सरकारने अदयाप त्यावर कोणताही निर्णय घेतला नाही. त्यामुळे संपूर्ण मराठा समाज जरांगे पाटलाच्या समर्थनार्थ महाराष्ट्र भर आंदोलन उभे करीत आहे. व त्याचाच भाग म्हणून नेवासा शहर व तालुक्यातील मराठा समाज व सदर मागणीला पाठिंबा देणारे इतर समाजातील नागरिक खोलेश्वर गणपती चौक येथे आमरण उपोषण सुरु करणार आहोत असे निवेदनात नमुद केले होते.


      आमरण उपोषणा बरोबरच साखळी उपोषण, चक्री उपोषण, रस्ता रोको आदि मार्गाने आंदोलन करून आरक्षण लढयाला पाठिंबा देणार असल्याचे भाऊसाहेब वाघ यांनी सांगितले. सरकारने याबाबत गंभीर दखल घेउन आरक्षणाचा प्रश्न त्वरीत सोडवावा. प्रश्न सुटेपर्यंत नेवासा येथील उपोषण चालूच ठेवण्याचा निर्धार विधितज्ञ के .एच.वाखुरे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.


    उपोषण स्थळी सर्वधर्मीय व  सर्वपक्षीय तसेच विविध संस्था व संघटनेचे प्रमुख पदाधिकारी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या