हातभटटी गावठी दारू निर्मिती, विक्री ठिकाणावर राज्य उत्पादन शुल्क, अहमदनगर विभागाची धडक कारवाई

 हातभटटी गावठी दारू निर्मिती, विक्री ठिकाणावर राज्य उत्पादन शुल्क, अहमदनगर विभागाची धडक कारवाईश्रीरामपूर : प्रतिनिधी


 डॉ. विजय सुर्यवंशी, आयुक्त राज्य उत्पादन शुल्क महाराष्ट्र राज्य मुंबई यांनी राज्यातील हातभट्टी दारू विरुद्ध सुरु केलेली हातभटटीमुक्त गाव मोहिम अधिक परिणामकारक करण्याबाबत दिलेल्या सूचनान्वये तसेच सुनिल चव्हाण, संचालक, (अंवद), राज्य उत्पादन शुल्क महाराष्ट्र राज्य मुंबई, मोहन वर्दे विभागीय उप आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, पुणे विभाग, तसेच प्रमोद सोनोने, अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क अहमदनगर, सुजित पाटील उपअधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, अहमदनगर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हयातील सर्वच तालुक्यात दि. २८ ऑक्टोबर ते २९ ऑक्टोबर या दोन दिवसाचे कालावधीत हातभटटी गावठी दारू निर्मिती व विक्री विरोधात विशेष मोहिम राबविण्यात आली.

       सदर मोहीमेत २२ गावठी दारू निर्मितीचे अडडे उध्वस्त करण्यांत आले असून एकूण १३ हातभटटी दारू विक्री करणाऱ्या ठिकाणावर व ५ हॉटेलवर कारवाई करण्यांत आली आहे. सदरील कारवाईत एकूण ४० गुन्हे नोंद करण्यांत आलेले असून ४१ आरोपींवर महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम १९४९ अन्वये कारवाई करण्यात आली आहे. सदरील कारवाईत एकूण सहा लाख ४६ हजार ६१३ रुपयांचा मुददेमाल नष्ट करण्यात आला आहे.

       सदर कारवाईत तयार रसायन २१ हजार ३०० लीटर व तयार हातभट्टी गावठी दारु १ हजार ३४१ लीटर नष्ट करण्यात आली आहे. देशी विदेशी दारुचाही मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

तसेच अवैध मद्यविक्री करणारे ढाबे तथा हॉटेल्स यांच्यावर देखील कारवाई करण्यात आली असून सदरील ठिकाणी मद्यसेवन करणा-या लोकांवर महाराष्ट्र दारुबंदी कायदा १९४९ कलम ६८ व,८४ अन्वये कारवाई करण्यात आली आहे. सदरील कारवाई मुळे अवैध मद्यविक्री करणा-यांचे तसेच हातभट्टी निर्मीती करणारांचे अवैध ठिकाणी मद्य सेवन करणारांचे चांगलेच ढाबे दणाणले आहेत.

         सदर कारवाईत प्रशिक्षनार्थी उप अधीक्षक सागर शेलार, जी .व्ही कसरे यांचेसह अ, विभागाचे निरीक्षक. एम.एम. राख, ब विभागाचे निरीक्षक जी.टी,खोडे, संगमनेर विभागाचे निरीक्षक एस वाय श्रीवास्तव ,कोपरगाव विभागाचे निरीक्षक एस एस.हांडे श्रीरामपुर विभागाचे निरीक्षक बी.बी.हुलगे भरारी पथक क्र १ अहमदनगरचे निरीक्षक ए. बी.बनकर, भरारी पथक क्र २ श्रीरामपुरचे निरीक्षक गोपाल चांदेकर यांचे सह विभागातील दुय्यम निरीक्षक सहाय्यक दुय्यम निरीक्षक व जवान यांचे विशेष सहकार्य लाभले.

अवैध मद्यविक्री करणारे ढावे व हॉटेल्स तसेच हातभटटी दारू निर्मिती व विक्री ठिकाणावर यापुढेही सातत्याने कारवाई सुरू राहणार असल्याची माहिती अहमदनगर जिल्ह्याचे अधीक्षक प्रमोद सोनोने, यांनी प्रसार माध्यमांना दिली.


आपल्या परिसरात अवैध मद्यविक्री होत असल्याचे निदर्शनास आल्यास विभागाचे नियंत्रण कक्षातील टोल फ्री क्रमांक १८००२३३९९९९ व व्हॉट्स ॲप क्रमांक ८४२२००११३३ वर तक्रार करावी. असे आवाहन विभागाचे वतीने करण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या