बाजार समिती बाबत पणन संचालकांकडे तक्रार

 संचालक ज्ञानेश्वर जगताप यांचा अर्ज; सीबीआय कडे तक्रार करण्याचा इशारा





वैजापूर :  
______________________________

वैजापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कामकाजाबाबत बाजार समितीचे संचालक ज्ञानेश्वर जगताप यांनी पणन संचालकाकडे तक्रार अर्ज दाखल केला आहे. बाजार समितीचे निवृत्त संचालकांसह रोजंदारीवर कामावर ठेवलेल्या कर्मचाऱ्यांच्या पगारापोटी जवळपास दहा ते बारा लाख रुपयांचा खर्च होत असून या खर्चाची कुठलीही नोंद बाजार समितीच्या लेखांमध्ये दिसत नाही. निवृत्त सचिवाच्या पगारासाठी व्यापाऱ्यांकडून फीस म्हणून परस्पर दहा लाख रुपये वसूल करून सचिवांना पगार दिला. बाजार समितीने कामासाठी रोजंदारीवर मुले ठेवले असून त्यावर प्रति महिना दोन लाख रुपये खर्च आहे. असा आरोप बाजार समितीचे संचालक ज्ञानेश्वर जगताप यांनी पणन संचालक यांना दिलेल्या अर्जात केला आहे. बाजार समितीचे सभापती व सचिव यांचा मनमानी कारभार थांबवण्यात यावा अशी मागणी त्यांनी केली आहे. येत्या आठ दिवसांत या प्रकरणाची सखोल चौकशी न झाल्यास सीबीआयकडे तक्रार दाखल करण्याचा इशारा निवेदनात दिला आहे. 

______

उपसभापती पतींचा हस्तक्षेप थांबवा

३१ ऑगस्ट रोजी झालेल्या बाजार समितीच्या मासिक बैठकीत उपसभापती शिवकन्या पवार या गैरहजर होत्या. असे असतांना त्यांचे पती मधुकर पवार हे उपसभापतींच्या खुर्चीमध्ये बसुन बाजार समितीचा कारभार हाताळत असल्याची धक्कादाय बाब समोर आल्याचे जगताप यांनी तक्रारीत म्हंटले आहे. ते राजरोसपणे बैठकीत बसुन कामकाज हाताळुन खोट्या सह्या करतात असा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या