लष्करी प्रशिक्षणादरम्यान सुटलेल्या गोळीने घेतला तरुणाच्या डोक्याचा वेध!नगर : संभाजीनगर महामार्ग लगत असलेल्या लष्कराच्या प्रशिक्षण केंद्रा जवळ डोक्यात गोळी लागल्याने किरण मांजरे नावाचा तरुण जखमी झाला. प्रशिक्षण सुरू असताना सुटलेली गोळी चुकून मांजरे यांच्या डोक्यात लागली. दरम्यान मांजरी याच्यावर उपचार सुरू असून त्याची प्रकृती सुधारत असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. 

लष्करी जवानांचे प्रशिक्षण सुरू असताना सुटलेली गोळी चुकून प्रशिक्षण केंद्र बाहेरील नगर संभाजीनगर महामार्गाने जाणाऱ्या तरुणाला लागली. सायंकाळी सात ते साडेसात वाजेच्या सुमारास ही घटना घडली. उपस्थित नागरिकांनी तातडीने जखमी किरण मांजरे याला शेजारील खाजगी रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करत गोळी काढली. 

दरम्यान गोळीबाराची घटना टोळी युद्धातून घडल्याची चर्चा शहरात पसरली. त्यामुळे काही काळ दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत गोळीबाराचे सत्य समोर आणले. लष्करी जवानांच्या प्रशिक्षणा दरम्यान यापूर्वीही गोळीबारात काही लोक जखमी झाल्याची उदाहरणे आहेत. अशा प्रकारांमध्ये गुन्हा दाखल होत नाही. पोलीस प्रशिक्षण केंद्राला पत्र व्यवहार देऊन काळजी घेण्याचे आवाहन करणार आहेत. या गोळीबाराचे भांडवल करून टोळी युद्धाची अफवा पसरवणाऱ्यांवर मात्र गुन्हा दाखल करणारा असल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. 

टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या

  1. pgjokervip จะเป็นหนทางสำหรับการได้กำไรจากการเล่นเกมสล็อตออนไลน์ pg slot ที่นักเล่นการพนันทุกคนสามารถไว้เนื้อเชื่อใจสำหรับในการใช้งานได้เสมอเลย แน่ๆว่าเว็บของพวกเราให้บริการ

    उत्तर द्याहटवा