जी.प.प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांंना डिजिटल ओळखपत्र वितरण

 


जळगाव  : 

राहता तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जळगाव येथे शुक्रवारी (दि.६) रोजी जी.प प्राथमिक शाळेला योगेश रंजक चौधरी यांनी पंधरा हजार रुपये रोख स्वरुपात देणगी दिली या रकमेतून इयत्ता पहिली ते इयत्ता चौथीच्या वर्गात शिक्षण घेणार्‍या सर्व विद्यार्थ्यांंना पंचक्रोशीत प्रथमच उपक्रम राबवत जी.प शाळेतील १०३ विद्यार्थ्यांंना ज्येष्ठ नागरीक पंढरीनाथ चौधरी,प्रल्हाद चौधरी,बाबासाहेब चौधरी यांच्या हस्ते सर्व विद्यार्थ्यांंना क्यूआर बेस 'डिजिटल आयडी कार्ड' वितरण करण्यात आले.

या प्रसंगी योगेश रंजक चौधरी आयडी कार्ड विषय अधिक माहिती देताना देताना म्हणाले की राहाता तालुक्यातील ग्रामीण भागातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत घेतलेला पाहिलाच उपक्रम आहे या डिजिटल कार्डचे स्वरुप व टेक्निकल माहिती देताना चौधरी म्हणाले की 'क्विक रिस्पॉन्स कोड' अर्थात क्यूआर कोड बेसवर आधारित आधुनिक प्रकारचे आयडी कार्ड सर्व विद्यार्थ्यांंना उपलब्ध करून देण्यात आले आहे. 


 कार्ड वरील पुढील बाजूस विद्यार्थ्यांच्या फोटो सह अन्य संपुर्ण माहिती उपलब्ध आहे कधी अनावधानाने विद्यार्थी कुठे हलविल्यास कार्डच्या मागील बाजूला असलेला क्यूआर बारकोड मोबाईल द्वारे स्कॅन केल्यावर शाळेची संपूर्ण माहिती मिळते विद्यार्थी कुठल्या इयत्तेत शिकतो विद्यार्थ्याची स्टुडंट आयडी विद्यार्थी कुठला आहे पालकांचा कॉन्टॅक्ट नंबर यांची संपुर्ण माहिती सदर बारकोड स्कॅन केल्यानंतर मोबाईलवर त्वरित उपलब्ध होते.या नवीन उपक्रमाचे सर्व पालकांनी स्वागत व कौतुक केले.


 याप्रसंगी, माजी शाळा व्यवस्थापन कमिटी अध्यक्ष बाबासाहेब अण्णासाहेब चौधरी,नुतन शाळा व्यवस्थापन कमिटी अध्यक्ष गोरक्षनाथ बबनराव चौधरी,शाळा व्यवस्थापन कमिटी सदस्य बाळासाहेब प्रल्हाद चौधरी,विजय भास्कर चौधरी,महेंद्र मुरलीधर चौधरी,रविंद्र छबुराव चौधरी,शैलेश मच्छिंद्र चौधरी,योगेश मुरलीधर पंडित,बाळासाहेब शिनगारे आदी मान्यवर उपस्थित होते.आयडीकार्ड बनविण्यासाठी सर्व विद्यार्थ्यांचे ऋतिक रमेश चौधरी,प्रतीक रमेश चौधरी,यांनी कॅमेराद्वारे फोटो काढण्यास सहाय्य केले या प्रसंगी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक रंगनाथ देठे यांनी केले यावेळी शिक्षक संतोष हेकरे शिक्षिका मेघा बागुल,यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती संगीता अहिरे यांनी देणगीदारांचे आभार मानले.



डिजिटल आयडी कार्ड कॉन्सेप्ट आहे तरी काय....?

आपल्या ग्रामीण भागातील मराठी शाळेतील मुलांना असे वाटायला नको की इंग्लिश मीडियम आणि मराठी मीडियम या मध्ये काही फरक आहे मराठी शाळेत मुलांना भेटणारे आयडी कार्ड हे अत्यंत साध्या स्वरूपाचे असतात परंतु आम्ही ह्या कार्डचे स्वरुप 'डिजिटल क्यूआर' आधारित प्रकाराचे ठेवले आहे बारकोड मध्ये फक्त विद्यार्थ्याची माहितीच नव्हे तर सदर डिजिटल क्यूआर स्कॅन केल्यावर विद्यार्थ्यांंना सौरमाले बद्दल माहिती उपलब्ध होते सौरमालेत किती ग्रह आहेत ते ग्रह एकमेकांपासून किती अंतरावर आहे याची विद्यार्थ्यांंना अभ्यासासाठी माहिती उपलब्ध होते ग्रामीण भागातील विद्यार्थी या आधुनिक डिजिटल आयडी कार्डचा उपयोग अभ्यासाच्या दृष्टीनेही करू शकतात. 
योगेश रंजक चौधरी 




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या