श्रीरामपुरातील शाहरुखचा खून; संशयित ताब्यात
श्रीरामपूर : शहरातील नॉर्दन ब्रांच परिसरात पाटाच्या कडेला शाहरुख शहा उर्फ गाठण (रा-वार्ड नं.०२, श्रीरामपूर) यांचा बुधवारी (०४ऑक्टोबर) सायंकाळी साडेसात ते आठच्या सुमारास कडप्पा डोक्यात मारून खून करण्यात आला. खून केल्यानंतर मारेकरी पसार झाले.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शाहरुख व त्याचे तीन चार साथीदार नॉर्दन ब्रांच परिसरातील एका हॉटेलमध्ये गेले होते. तेथे दारू पिल्यानंतर त्यांच्यात वाद झाले. हॉटेल मधून बाहेर आल्यानंतर रस्त्याच्या कडेला त्यांच्यात बराच वेळ चर्चा झाली. पुन्हा ते पुनम हॉटेलच्या मागील बाजूस गेले. तेथे पुन्हा वाद झाल्यानंतर बाजूला पडलेला कडप्पा शाहरुखच्या डोक्यात मारला. जबर मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. हत्येनंतर मारेकरी पसार झाले.
घटनेनंतर बघ्यांची प्रचंड गर्दी झाली. तात्काळ पोलिसांना घटनास्थळी पाचारण करण्यात आले. अज्ञात युवकांनी खून केल्याची माहिती पोलिस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांना मिळताच श्रीरामपूर उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. बसवराज शिवपूजे व पोलीस टीम घटनास्थळी दाखल होऊन घटनास्थळाची पहाणी केली व पंचनामा करून मयतास साखर कामगार रुग्णालयात पाठविण्यात आले. वादाचे कारण समजू शकले नसून श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन या ठिकाणी नागरिकांनी गर्दी केली. काही संशयित युवकांना ताब्यात घेण्यात आले आहे.
0 टिप्पण्या