किरीट सोमय्यांची बातमी दाखवल्याने माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने केली कारवाई
मुंबई : किरीट सोमय्या वृत्त प्रकरणी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने आज शुक्रवारी सायंकाळी ७ वाजल्यापासून पुढील ७२ तासांसाठी लोकशाही वृत्तवाहिनी बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. लोकशाही मराठी वृत्तवाहिनीचे मुख्य संपादक कमलेश सुतार यांनी ही माहिती दिली आहे.
लोकशाही वृत्तवाहिनीचे संपादक मंडळ या आदेशाबाबत कायदेशीर सल्ला घेत आहे. किरीट सोमय्या वृत्त प्रकरणी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने लोकशाही वृत्तवाहिनीला नोटीस बजावली आहे.
माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या आदेशानुसार, शुक्रवार संध्याकाळी ७ ते सोमवारपर्यंत पुढील ७२ तास लोकशाही वाहिनी बंद राहणार आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या आदेशाचे पालन करणार असल्याचे लोकशाही वृत्तवाहिनीने स्पष्ट केले.
यापूर्वीही किरीट सोमय्या यांच्यावरील अश्लील व्हिडीओ दाखविल्यानंतर लोकशाही वृत्तवाहिनीचे प्रसारण अचानक बंद करण्यात आले होते. त्यावेळी कमलेश सुतार यांनी काही तांत्रिक अडचणींमुळे लोकशाही वृत्तवाहिनीचे प्रसारण बंद करण्यात आल्याचे सांगितले होते. लोकशाही मराठी वृत्तवाहिनीचे प्रक्षेपण बंद झाल्यानंतर काही तासांनी थेट प्रक्षेपण सुरू झाले.
_____
"आमची बाजू ऐकून घेतली जाईल, अशी अपेक्षा होती. पण, आपल्याकडे थेट शिक्षेचा प्रकार आहे. या प्रकरणी आम्ही कायदेशीर लढाई लढणार आहोत".
- कमलेश सुतार
0 टिप्पण्या