पाच राज्यांच्या निवडणुका आज जाहीर होणार असून त्यासाठी दुपारी 12 वाजता केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे.
मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, मिझोरम, आणि तेलंगणाची निवडणूक जाहीर होणार होणार असून लोकसभेसाठी या निवडणुका लिटमस टेस्ट ठरतील असे बोलले जात आहे.
गेल्या काही दिवसांपासून या निवडणुका लोकसभेसोबतच होणार का? याची चर्चा सुरू होती पण तूर्तास त्याला पूर्णविराम मिळाला.
मागच्यावेळी यातली तीन राज्यं काँग्रेसने जिंकली होती. यावेळी काय होणार? याबाबत देशभर उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
0 टिप्पण्या