Fwd: जमिनीच्या वादातून चिंभळ्यात गोळीबाराचा थरार : सहा गोळ्या अंगावर झाडून पिस्तूल केले रिकामे : परिसरात प्रचंड दहशत.

 



श्रीगोंदा प्रतिनिधी :  


श्रीगोंदा तालुक्यातील चिंभळा या ठिकाणी काल रात्री साडे सातच्या सुमारास मढेवडगाव चिंभळा रस्त्यावरील हॉटेल पन्हाळा येथे संतोष ऊर्फ लाला  बबन गायकवाड ( वय ३० वर्षे) रा. चिंभळा यांच्यावर जयदीप दत्तात्रय सुरमकर रा. चिंभळा याने सहा गोळ्या झाडल्या.  जखमी लला गायकवाड यांना तातडीने पुणे येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये हलवले असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते. 

            याबाबत बेलवंडी पोलीस ठाण्यात सुनिल राजू गायकवाड यांनी फिर्याद नोंदवली आहे. याबाबतची सविस्तर माहिती अशी पन्हाळा हॉटेलवर शेत जमिनीच्या वादाबाबत चर्चा चालू असताना आरोपी जयदीप सुरमकर याने पिस्तूल काढून लाला गायकवाड याच्यावर गोळीबार केला. लाला गायकवाड यांच्यावर गोळीबार होताच ते हॉटेलच्या तारेच्या कंपाऊंडवरून जिवाच्या भीतीने मढेवडगावच्या दिशेने पळत सुटला. यावेळी जयदीप सुरुमकर याने लाला यांचा पाठलाग करून त्याला जिवे मारण्याच्या उद्देशाने छातीवर, कानावर, डाव्या हाताच्या दंडावर, हाताच्या पंजावर उजव्या पायाच्या खुब्यावर तसेच गुप्त भागावर गोळ्या झाडल्या असे फिर्यादीत नमूद केले आहे. पोलिसांना खबर मिळताच बेलवंडी व श्रीगोंदा पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी गेला.
               रात्री उशिरा नगर येथील फॉरेन्सिक लॅब पथक, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, कर्जत उपविभागीय पोलिस अधिकारी विवेकानंद वाखारे, बेलवंडी पोलिस निरीक्षक संजय ठेंगे, श्रीगोंदा पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर भोसले, उपनिरिक्षक प्रकाश चाटे, मोहन गाजरे, समीर अभंग, रोहिदास झुंजार घटनास्थळी येऊन तपास करत होते. सकाळी घटनास्थळी विविध पथके दाखल झाली होती या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक संजय ठेंगे व उपनिरिक्षक मोहन गाजरे करत आहेत.


दिवसेंदिवस का वाढत चाललेले जमिनीचे वाद , 

आपले कायदे किचकट आणि तोकडे आहेत का ?

आपण अनेकदा पहिले आहे की जमिनीच्या वादातून खून गंभीर दुखापत जीवे मारण्याचा प्रयत्न अश्या अनेक घटना सर्वाना ज्ञात आहेत मात्र याबाबत कायद्यात कठोरात कठोर कारवाईची उपलब्धता केल्यास अश्या प्रकरणाला आळा बसेल असेही अनेक तज्ज्ञांचे मत आहे मात्र आतातरी कायदे किचकट आणि तोकडे आहेत असेही त्यांनी बोलताना सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या