MPDA : श्रीरामपूरचा दाभाडे, श्रीगोंद्याचा कोथींबीरे स्थानबद्ध

 

एमपीडीए कायद्याअंतर्गत कारवाई; नाशिक कारागृहात रवानगी



नगर : जिल्हयातील श्रीगोंदा व श्रीरामपुर तालुका हद्दीत सार्वजनीक सुव्यवस्था बाधीत करणारे तसेच वाळु तस्करी करणाऱ्या दोघांना जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ, यांनी एम.पी.डी.ए. कायदयान्वये स्थानबध्द केले. यामध्ये बंटी उर्फ संतोष दत्तात्रय कोथींबीरे (वय 34 )रा. साळवणदेवी रोड, श्रीगोंदा, ता. श्रीगोंदा, जि. अहमदनगर व अर्जुन खुशाल दाभाडे,( वय 36 )वर्षे, रा. वॉर्ड नं. 1, गोंधवणी, श्रीरामपुर यांचा समावेश आहे.

           यातील श्रीगोंदा पोलीस स्टेशन हद्दीमध्ये बंटी उर्फ संतोष दत्तात्रय कोथींबीरे वय 34 रा. साळवणदेवी रोड, श्रीगोंदा, ता. श्रीगोंदा, जि. अहमदनगर याने सराईतपणे गैरकाद्याची मंडळी एकञ करुन दंगा करणे, धारदार हत्यार चाकु, लोखंडी गज व दगडाने मारहान करुन दुखापत करणे, शिवीगाळ करुन जिवे ठार मारण्याची धमकी देणे, संगणमत करुन गुन्हे करणे, अनाधिकाराने बेकायदा रस्ता आडविणे, चोरी करण्याच्या उदेशाने मिळुण येणे, बेकायदा नदीपाञातुन शासकीय वाळुची अवैदयरित्या विनापरवाना चोरी करुन तिची विक्री करणे असे गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर वेळोवळी प्रतिबंधक कारवाई करण्यात येवुन देखील त्याच्या वर्तनात सुधारणा होत नसल्याने त्याचेवर प्रतिबंध होण्यासाठी त्याचे विरुध्द एम.पी.डी.ए. कायदयान्वये स्थानबध्दतेची कारवाई होण्यासाठी पोलीस निरीक्षक, ज्ञानेश्वर भोसले, श्रीगोंदा पोलीस स्टेशन यांनी प्रस्ताव सादर केला होता.

  कोथींबीरे याचे विरुध्द श्रीगोंदा पोलीस स्टेशनला खालील प्रमाणे गुन्हे दाखल आहेत. त्याच प्रमाणे श्रीरामपुर तालुका पोलीस स्टेशन, एमआयडीसी ,सोनई, नगर तालुका पोलीस स्टेशन तसेच छत्रपती संभाजीनगर जिल्हयातील गंगापुर, पोलीस स्टेशन हद्दीमध्ये अर्जुन खुशाल दाभाडे, वय 36 वर्षे, रा. वॉर्ड नं. 1, गोंधवणी,श्रीरामपुर, जि. अहमदनगर याने सराईतपणे गुन्हे करुन गैर कायदयाची मंडळी जमवुन घातक शस्त्र व अग्नीशस्त्रासह खुनाचा प्रयत्न करणे, शासकीय कर्मचाऱ्यांच्या शासकीय कामात अडथळा निर्माण करुन सार्वजनीक आरोग्य व सुरक्षततेस बाधा आणणारे कृत्य करणे, दरोडया प्रयत्न करणे, साथीदारांसह वाळु चोरी करणे असे सार्वजनीक सुरक्षीततेस बाधा होईल असे कृत्य केल्याने त्याचे विरुध्द गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर ही वेळोवळी प्रतिबंधक कारवाई करण्यात येवुन सुध्दा त्याच्या वर्तनात सुधारणा होत नसल्याने त्याचेवर प्रतिबंध होण्यासाठी त्याचे विरुध्द एम.पी.डी.ए. कायदयान्वये स्थानबध्दतेची कारवाई होणेकामी पोलीस निरीक्षक, हर्षवर्धन गवळी, श्रीरामपुर शहर पो.स्टे. यांनी प्रस्ताव सादर केला होता.

  वरील प्रमाणे गुन्हे दाखल असल्याने त्याचे विरुध्दचे एम.पी.डी.ए. प्रस्ताव संबंधीत उप विभागीय पोलीस अधीकारी, कर्जत विभाग, व श्रीरामपुर विभाग यांचे व अपर पोलीस अधीक्षक अहमदनगर व श्रीरामपुर यांचे मार्फतीने पोलीस अधीक्षक कार्यालय, अहमदनगर येथे सादर करण्यात आले होते. यासाठी पोना/ संभाजी गर्जे, श्रीगोंदा पोलीस स्टेशन व पोना/ बिरप्प करमल, संतोष दरेकर नेम. श्रीरामपुर शहर पोलीस स्टेशन अशांनी परीश्रम घेतलेले होते.

 प्राप्त प्रस्तावांची पोलीस अधीक्षक राकेश ओला, यांनी पडताळणी करुन अहवाल जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ, यांना सादर केले होते. प्रस्तावांची व कागदपत्रांची पडताळणी करुन (1) बंटी उर्फ संतोष दत्तात्रय कोथींबीरे वय 34 रा. साळवणदेवी रोड, श्रीगोंदा, ता. श्रीगोंदा, जि. अहमदनगर व (2) अर्जुन खुशाल दाभाडे, वय 36 वर्षे, रा. वॉर्ड नं. 1, गोंधवणी,श्रीरामपुर, जि. अहमदनगर यांना नाशिक मध्यवर्ती कारागृह, नाशिक येथे स्थानबध्द करणे बाबतचे आदेश दिनांक 07/10/2023 रोजी पारीत केले आहेत.

 वरील प्रमाणे पोलीस अधीक्षक राकेश ओला, यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे दिनेश आहेर, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर, पोहेकॉ/ रविंद्र पांडे, राम माळी, दत्तात्रय गव्हाणे, पोना/ रविंद्र कर्डीले, सचिन आडबल, पोकॉ/ रोहीत मिसाळ, भाऊसाहेब काळे, अमोल कोतकर, शिवाजी ढाकणे, बाळासाहेब गुंजाळ यांनी वरील दोन्ही इसमांना तात्काळ ताब्यात घेवुन संबंधीत पोलीस स्टेशन मार्फतीने मध्यवर्ती कारागृह, नाशिक येथे जमा केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या