नेवासा शहरात मनोज जरांगे यांची जाहीर सभा
नेवासा।
सकल मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचा महाराष्ट्र दौरा निश्चित झाला असून नेवासा शहरातील नगरपंचायत चौकात दि.२३ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता जाहीर सभा होणार असल्याची माहिती संयोजकांनी दिली आहे.
नेवासा फाटा रोडवरील पावन गणपती मंदिर प्रांगणात श्रीरामपूर येथील मराठा आरक्षण आंदोलक नितीन पटारे यांचे उपस्थितीत सभेच्या पूर्वतयारीसाठीची बैठक नुकतीच संपन्न झाली. तालुका व परिसरातून मराठा आंदोलक कार्यकर्ते बाळासाहेब कोकणे, सोमनाथ चिंधे, संभाजी कार्ले,नंदकुमार पाटील,गणेश निमसे ,जयवंत मोटे,सतीश गायके,अँड.बाळासाहेब गरड, अँड.अशोक करडक,अँड.मयुर वाखुरे,संभाजी गायकवाड,सुनील वाघ,ज्ञानेश्वर पेचे,बाबा कांगुणे,ह.भ.प.भगवान महाराज डिके,बद्रीनाथ चिंधे,भरत बेल्हेकर,संदीप दरंदले, दीपक धनगे, डॉ.कोलते,डॉ.करण घुले,अँड.एन.बी.आडसुरे,राजेंद्र उंदरे,किशोर जोजार,विलास चव्हाण,गणेश कोरेकर,सुहास पठाडे,नानासाहेब पवार,निलेश पाटील,कैलास झगरे,बद्री चिंधे,अंबादास भदगले, अभिजित देशमुख,अमोल जोगदंड,सुभाष नांदे,महेश लोखंडे,यावेळी उपस्थित होते.
अँड.के.एच.वाखुरे यांनी प्रास्ताविक केले.भाऊसाहेब वाघ यांनी रूपरेषा समजावून सांगितली.नितीन पटारे यांनी यावेळी विविध सूचना केल्या. अनेकांनी मार्गदर्शक सूचना मांडल्या.अनिल ताके यांनी उपस्थितांचे आभार मानले.
यावेळी शिवा मोरे,गणेश सावंत,रामेश्वर तनपुरे,कानीफनाथ डिके,योगेश डिके,ज्ञानेश्वर वाघ,ज्ञानेश्वर पेचे,दिलीप शिंदे,जयसिंग गायकवाड,नवनाथ जोजार,आबासाहेब जोजार,अमोल शिर्के,कानिफनाथ दिघे,सचिन मोटे,महेश कोकणे,अमोल मारकळी,अनिल डौले,महेश शेजुळ आदी हजर होते.
0 टिप्पण्या