चितळी आर.पी.आय शाखेचा १८ वा वर्धापनदिन उत्साहात

 चितळी आर.पी.आय शाखेचा १८ वा वर्धापनदिन उत्साहात


चितळी: 

राहाता तालुक्यातील चितळी येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) चितळी शाखेचा १८ वा वर्धापनदिन सोमवारी (दि.१३) रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.रामदासजी आठवले साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली १३ नोव्हेंबर २००५ रोजी आर.पी.आय चितळी शाखेची स्थापना करण्यात आली होती.

शाखेच्या माध्यमातुन घटनापती डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रेरणादायी विचार पोहोचविण्याचे चळवळ उभे करण्याचे काम अठरा वर्षापासुन शाखेच्या वतीने होत आहे आर.पी.आय.चे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले साहेब यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील तळागाळातील प्रत्येक भीमसैनिकांपर्यंत आंबेडकरी चळवळीतील विचार पोहोचविण्याचे कार्य चितळी आर.पी.आय शाखेच्या वतीने करण्यात येते आणि पुढील भविष्यातही असेच चांगले कार्य शाखेकडून होतील असे मत उपस्थीत प्रमुख मान्यवरांनी व्यक्त केले. यावेळी फ्लेक्सचे नूतनीकरण करण्यात आले मान्यवरांच्या हस्ते फ्लेक्सला पुष्पहार घालण्यात आला.

या प्रसंगी आर.पी.आय जिल्हाउपाध्यक्ष योगेश बनसोडे, शाहीर बनसोडे,सोना पगारे,युवा नेतृत्व सागर पगारे फकीरा भाऊ गायकवाड, अशोक शिंदे,रमेश जाधव, प्रभाकर वाघ, कमलेश वाडते,संजय गायकवाड,कैलास कुऱ्हाडे,वाणी बाबा,अशोक साबळे, संदीप बनसोडे, विशाल बनसोडे,राजेंद्र अल्हाट, बाळासाहेब सरदार, विजय लोखंडे,साहेबराव गायकवाड,जावेद शेख आदींसह चितळी स्टेशन परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येत उपस्थित होते.

  

भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे अनमोल विचार समाजात पोहोचविण्याकरिता सर्व समाजाच्या हितासाठीसाठी रिपब्लिकन पार्टी इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखाली तळागाळातील भीमसैनिकांच्या सोबतीने चितळी आर.पी.आय शाखेचे १८ व्या वर्षात पदार्पण झाले या पुढेही शाखेच्या माध्यमातुन जनहिताची कामे करण्याचा आमचा प्रयत्न राहील.. :- योगेश बनसोडे आर.पी.आय  जिल्हाउपध्यक्ष 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या