गावचा विकास करणे हाच ध्यास : सुरडकर

 गावचा विकास करणे हाच ध्यास : सुरडकर

चितळी / रामपूरवाडी:



आम्ही सहकार्यातून प्रयत्नशील आहोत असे मत युवा सरपंच संदीप सुरडकर  पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले म्हणाले की आमच्या घरची परिस्थिती खुप बेताची होती सुरुवातीला आमच्या कुटुंबाला कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसताना आम्ही २०२१ साली ग्रामपंचायत निवडणुकीत उभे राहण्याचे आवाहन केले व सरपंच पदासाठी कोपरगाव विधानसभेच्या प्रथम महिला आमदार मा.स्नेहलताताई कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायत निवडणुकीसाठी अर्ज दाखल करून थेट जनतेतून निवडणूक लढवली मतदार बंधू भगिनींनी ही आमच्यावर विश्वास स्थापन करून सर्व रामपूरवाडी ग्रामस्थांच्या सहकार्याने ग्रामस्थांनी दाखविलेल्या आपुलकीने आमचा पॅनल भरघोस अश्या मताने विजयी झाला.

वयाच्या अवघ्या २३ व्या वर्षी युवा सरपंच म्हणुन आम्हाला स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये सरपंच पदी काम करण्याची संधी मिळाली उच्चशिक्षित असल्यामुळे आम्हाला ग्रामपंचायतीच्या विविध योजनेबद्दल माहिती उपलब्ध होती त्या शासकीय योजना गावात राबविण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू होते या माध्यमातून गावाचा विकास व्हावा हाच आमचा उद्देश आहे, गेल्या दोन वर्षात गावातील अंतर्गत रस्ते दुरुस्ती करणे ग्रामस्थांच्या आरोग्याच्या दृष्टीने पाणी शुद्धीकरणासाठी आरो शेतीसाठी पाणी मिळवून विहिरीच्या पाणी पातळीत वाढ होण्यासाठी जलयुक्त शिवार योजनेतून गावठाणात बंधारे बांधण्याच्या कामासाठी पाठपुरावा करून याचा गावाला खुप फायदा होत असून रामपूरवाडी गाव पुर्णपणे पाणीदार कसे करता येईल यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, पुढील दोन वर्षाच्या कालावधीत संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष मा.श्री.बिपिन दादा कोल्हे माजी.आमदार स्नेहलता कोल्हे सहकार महर्षी स्व.शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष मा.श्री.विवेक भैय्या कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली दळणवळणाच्या दृष्टीने गावाला जोडणारे मुख्य व गावातील उर्वरित अंतर्गत पक्के रस्ते  गावासाठी मंजूर झालेली पाणीपुरवठा योजना योग्य व प्रभावीपणे राबविणे यासाठी आमचे मनस्वी प्रयत्न आहेत गावचा विकास करणे हाच आमचा ध्यास आहे.

पुणतांबा तीर्थक्षेत्र आम्हाला जवळ असल्याने आणि रेल्वेच्या माध्यमातून रामपूरवाडी येथे एखादा उद्योग व्यवसाय आणून येथील बेरोजगारांसाठी रोजगाराची संधी उपलब्ध करण्यासाठी मा.आ.स्नेहलता ताई कोल्हे यांच्या माध्यमातून पाठपुरावा करत आहोत गावात लवकरच नवनवीन रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील असे सरपंच संदीप सुरडकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले,आम्ही ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावाच्या विकासाच्या दृष्टीने समाजसेवेचे काम करत असताना आम्हाला ग्रामपंचायतीचे कार्याध्यक्ष बबनराव काळे उपसरपंच मंदाताई काळे समस्त सदस्य मंडळ आणि रामपूरवाडी ग्रामस्थांचे खुप मोठे व मोलाचे सहकार्य मिळत आहे.




गावचा विकास करण्यासाठी आम्ही सक्षम...!

सद्य स्थिती मध्ये गावच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या राजकारणात तीन गट सक्रिय आहेत परंतु प्रश्न जर गावच्या विकासाचा असेल तर आम्ही गावाच्या सर्वांगीण विकासासाठी 'समाजकारणाला' प्रथम प्राधान्य देतो गावाला विकासाच्या उंचीवर नेण्यासाठी आम्ही सर्वांना बरोबर घेऊनच गावाला नवचैतन्य निर्माण करून देण्याचा आमचा अजेंडा आहे संपूर्ण सदस्य मंडळाचे गावाच्या विकासाच्या दृष्टीने सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहे गावचा विकास करण्यासाठी आम्ही सक्षम आहोत.

 

युवा सरपंच संदीप सुरडकर 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या